खामगाव(बुलडाणा) : नगरपालिकेतील अधिकारी-कर्मचार्यामध्ये काल शुक्रवारी झालेला वाद आता थेट मुख्याधिकार्यांपर्यंंंत पोहोचला आहे. या प्रकरणामध्ये नगरपालिका कर्मचारी आणि अ.भा. सफाई मजदूर काँग्रेसने उडी घे तल्याने संबंधित कर्मचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत.नगरपालिकेतील आरोग्य निरीक्षक आणि वॉर्ड चपराशी यांच्यामध्ये शुक्रवार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता हमरी-तुमरी झाली होती. त्यापूर्वी नगराध्यक्षांच्या दालनात नगराध्यक्षांच्या उपस्थितीत दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. मात्र, काहींच्या मध्यस्तीमुळे प्रकरण निवळले होते. परंतु, नगराध्यक्ष निघून गेल्यानंतर पुन्हा दोघांमध्ये वाद उफाळून आला. यावेळी वॉर्ड चपराशी खेडकर यांनी आरोग्य निरीक्षक निळे यांच्याशी वाद घालत, हमरी-तुमरी केली. प्रकरण हाणामारीपर्यंंंत पोहोचले. परंतु, काही कर्मचार्यांनी प्रसंगावधान राखत दोघांनाही शांत केले. दरम्यान, या प्रकरणी आज शनिवारी नगरपालिका कर्मचारी संघटनेने मुख्याधिकार्यांशी चर्चा करून वॉर्ड चपराशाची अरेरावी संपुष्टात आणण्यासाठी कारवाईची मागणी लावून धरली. त्याचप्रमाणे अ.भा. सफाई मजदूर काँग्रेसनेही शहर अध्यक्ष सुनील उजैनवाल यांच्या नेतृत्वात मु ख्याधिकार्यांना वॉर्ड चपराशी खेडकर यांच्यावर कारवाईसाठी पत्र सादर केल्याची माहिती आहे.
कार्यालयात वरिष्ठांशी केलेला वाद भोवणार
By admin | Published: November 16, 2014 12:01 AM