स्थानिक विश्रामगृहामध्ये २० जून रोजी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार सारिका भगत यांच्याशी डॉ. शिंगणे यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाणंद रस्त्यासाठी १७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती डॉ. शिंगणे यांनी यावेळी दिली. शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये खत, बी-बियाणे व इतर शेती कामासाठी जाण्यासाठी जो रस्ता नकाशावर असेल त्याप्रमाणे त्याला शेतात जाण्याची मुभा राहणार आहे. याबाबत तहसीलदार सारिका भगत यांना आदेश देऊन पाणंद रस्त्याचे काम मार्गी लावून ज्या भागामध्ये पाणंद रस्ते नाहीत, अशा ठिकाणी रस्ते तयार करून शेतकऱ्यांच्या रस्त्याची समस्या सोडवाव्या, असे आदेश दिले. याच बरोबर कोरोना महामारीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली असली, तरी ३ लाख रुपयेपर्यंत शून्य टक्के व्याजाने कर्ज उपलब्धता महाविकास आघाडी सरकारने केली असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन वेळेवर आपले कर्ज भरून महाविकास आघाडी सरकारला सहकार्य करावे, अशी अपेक्षा डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केली. यासाठी संबंधित बँक व शाखा अधिकारी यांना आवश्यक त्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
लस घेण्याचे आवाहन
पालकमंत्री तथा अन्न औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सर्वसामान्य जनतेने लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी केले आहे. पालकमंत्री या नात्याने संबंधित आरोग्य विभागाला आपण आवश्यक त्या सूचना देऊन कोरोना या महामारीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा सक्रिय असून नागरिकांनी त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे.