शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

ते आले, त्यांनी पाहिले आणि बापलेकांनी मुलीला पळवले; आई-वडिलांसमोरच घडली घटना

By सदानंद सिरसाट | Published: August 28, 2023 7:31 PM

सदानंद सिरसाट खामगाव (बुलढाणा) : आई-वडिलांसोबत शेतात काम करीत असलेल्या मुलीला त्यांच्या डोळ्यादेखत दुचाकीने आलेल्या बापलेकांनी पळवून नेले. मुलीच्या ...

सदानंद सिरसाट

खामगाव (बुलढाणा) : आई-वडिलांसोबत शेतात काम करीत असलेल्या मुलीला त्यांच्या डोळ्यादेखत दुचाकीने आलेल्या बापलेकांनी पळवून नेले. मुलीच्या पालकांनी प्रतिकार केला असता त्यांना मारहाणही केल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील एका गावातील शेतात शनिवारी सायंकाळी सात वाजता घडली. पालकांच्या फिर्यादीवरून आरोपी बापलेकाविरुद्ध जळगाव जामोद पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

संबंधित मुलीच्या पालकाने शनिवारी सायंकाळी ७:३० वाजताच तक्रार दिली. त्यामध्ये गावातील शेतशिवारात काम करत असताना जळगाव जामोद येथील रहिवासी अमोल गजानन धामोळे (२४), गजानन धामोळे हे दोघे बापलेक दुचाकीने शेतात आले.

यावेळी १८ वर्षीय मुलगी त्यांच्यासोबत काम करीत होती. त्यांनी मुलीला दुचाकीवर बसवून पळवून नेले. यावेळी मुलीच्या आई-वडिलांनी त्यांना मज्जाव केला असता त्या दोघांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यावरून पोलिसांनी आरोपी बापलेकाविरुद्ध भादंविच्या कलम ३६५, ३२३ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकाॅ अतुल मोहाळे करीत आहेत.