लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ७० पेक्षा अधिक चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या एका अट्टल चोरट्यास गुन्हे शोध पथकाने मंगळवारी रात्री जेरबंद केले. शहरात चोरीच्या उद्देशाने एका आलिशान कारमधून संयशास्पद रित्या फिरत असताना शहर पोलिसांनी या अट्टल चोरट्यास मोठ्या शिताफीने अटक केले. खामगाव शहरातील चांदे कॉलनीतील लंबोदर अपार्टमेंट मधील विरेंद्र सुभाष दीपके यांच्या घरी ९ नोव्हेंबर २०१९ रोजी चोरी झाली होती. यामध्ये सोने, चांदीच्या नाण्यांसह गॅस सिलेंडर आणि रोख रक्कमेसह ४० हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला होता. ही चोरी करताना रशीद शहा हमीद शहा(तलवारसिंह) सीसी कॅमेऱ्यात आढळून आला होता. दरम्यान, १० नोव्हेंबर २०१९ रोजी डीबीरोडवरील समर्थ अपार्टमेंट मधील सचिन रमेश कोष्टी यांच्या घरी झालेल्या १ लाख ६१ हजार ८५० रुपयांच्या चोरीमध्येही रशीदशहा हमीदशहा उपाख्य तलवारसिंह याचा सहभाग होता. चोरीच्या या दोन्ही घटनांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. दरम्यान, गोपनिय माहितीवरून शहर पोलिसांनी रशीदशहा हमीद शहा यास मंगळवारी रात्री खामगाव शहरातील ताज नगरातून ताब्यात घेतले. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची व्यूहरचना!अट्टल चोरटा खामगावात येत असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी केली. त्यानंतर शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर, गुन्हे शोधपथकाने रविंद्र लांडे, संतोष वाघ, रविंद्र वानखडे, संदीप टाकसाळे, दीपक राठोड, सूरज राठोड, गजानन काकडे, संजय इंगळे, गजानन हिवाळे, शेळके आदींनी अतिशय शिताफीने ही साखळी मोहिम फत्ते केली.
खामगावात अट्टल चोरटा जेरबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 2:04 PM