लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा : विनापरवाना असलेल्या देशी दारूच्या १६ बॉक्ससह गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या कारवाईत पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, एका स्कॉर्पीओ जिपद्वारे अवैध देशी दारूचा साठा वाहतूक करण्यात येणार असल्याच्या माहितीवरून पथकप्रमुख सहायक पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्यासह सहकार्यांनी देऊळगावमहीनजीक एका स्कॉर्पीओ जिपची तपासणी केली. या कारवाईत अवैध देशी दारूचे १६ बॉक्स किंमत ५३ हजार ७६0 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. दरम्यान, जिल्हा गुन्हे शाखेने देशी दारू व जिपसह एकूण ५ लाख ३ हजार ७६0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संजय बाजीराव जाधव, अंबादास आo्रुबा बुरकुल, शरद कारभारी मान्टे या तिघांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला. दरम्यान, देऊळगावराजा पोलिसांनी आरोपींना १५ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने जामीनावर सुटका केली. सदर कारवाईत मनोज केदारे, पाहेकाँ ज्ञानेश नागरे, सय्यद हारून, दीपक पवार, गजानन जाधव यांनी सहभाग घेतला. अवैध दारू विक्री आणि वाहतुकीचे प्रमाण अलिकडील काळात वाढले असून, त्यानुषंगाने स्थागुशाने आता कारवाई सुरू केली आहे.