बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, शनिवारी आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. काेराेना मृत्यूने आतापर्यंत ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शनिवारी आणखी ८४५ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ८१९ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. उपचारादरम्यान चिखली येथील ६० वर्षीय पुरुष, पहुरजिरा (ता. शेगाव) येथील ७२ वर्षीय पुरुष व निंभोरा (ता. खामगाव) येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील १८४ , बुलडाणा तालुका म्हसला ९, येळगाव २, बोरखेडी २, पांगरी २, गिरडा २, अंभोडा २, माळवंडी ६, शिरपूर ३, तांदुळवाडी २, देऊळघाट ५, मासरूळ ४, धाड ४, टाकळी ३, करडी २, हतेडी २, सागवन २, मोताळा तालुक्यातील जयपूर ६, दाभाडी २, वाडी २, पान्हेरा ६, धा. बढे ३, किन्होळा २, खामगाव शहरातील ५२, खामगाव तालुका लांजुड २, आमसरी १, सुटाळा ५, मांडका १, गारडगाव १, घाटपुरी २, पिं. राजा २, वझर २, तांदुळवाडी २, शेगाव शहर २०, शेगाव तालुका आळसणा १, टाकळी १, मच्छिंद्रखेड १, जलंब २, पहुरजिरा २, चिखली शहरातील ३८ , चिखली तालुका उंद्री २, शेलूद २, चंदनपूर २, किन्ही नाईक १, पेठ १, कोनड १, अंचरवाडी १, मंगरूळ नवघरे १ चांधई १, वैरागड१, वाडी १, मुरादपूर २, ब्रम्हपुरी १, एकलारा १, भालगाव ३, शेलगाव जहा २, मलकापूर शहर ५७, मलकापूर तालुका निंबारी २, मोरखेड २, उमाळी ३, लासुरा १, घिर्णी २, वरखेड १, दाताळा १, दसरखेड २, दे. राजा शहर ३०, दे. राजा तालुका दे. मही ६, सिनगाव जहा २, चिंचखेड ५, खैरव २, धोत्रा नंदई १, मेंडगाव २, अंढेरा ५, गोंधनखेड ३, सिं. राजा शहर ५, सिं. राजा तालुका साखरेखर्डा ४, महारखेड २, दत्तापूर २, कि. राजा ५, निमगाव वायाळ ४, शेलगाव काकडे १, मेहकर शहर ५२, मेहकर तालुका शेंदला ५, दुर्गबोरी २, ब्रम्हपुरी २, परतापूर २, बोरी २, दे. माळी ३, हिवरा आश्रम १, उकळी २, संग्रामपूर तालुका भोन १, चौंढी १, जळगाव जामोद शहर ११, जळगाव जामोद तालुका : खेर्डा १, निंभोरा ३, भेंडवळ २, वडगाव पाटण २, आसलगाव २, पिं. काळे ६, नांदुरा शहर १८, नांदुरा तालुका केदार ६, निमगाव १, खुरकुंडी २, पोटा ३, शेलगाव मुकुंद ३, टाकळी वतपाळ ४, लोणार शहर १४, लोणार तालुका कि. जटटू १, बेलोरा २, देऊळगाव वायसा १, तांबोळा १, बिबी ४, पिंप्री २, सोनाटी ५, सुलतानपूर १, गोवर्धन २, शारा २, करणवाडी २, ब्राम्हण चिकना येथील एकाचा समावेश आहे. तसेच आज ८१९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.
५ हजार ७६८ रुग्णांवर उपचार सुरू
आज रोजी ५०४० नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल २ लाख ६३ हजार ९३९ आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण ४५ हजार २९१ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी ३९ हजार २२१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ५ हजार ७६८ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.