मेहकरात १०७ पाॅझिटिव्ह
मेहकर : शहर व तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असून, शुक्रवारी १०७ नवे पाॅझिटिव्ह आढळले आहेत, तसेच मारोती पेठ ता.मेहकर येथील ४५ वर्षीय पुरुष, हिवरा आश्रम ता.मेहकर येथील ५८ वर्षीय महिलेचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे.
बुलडाण्यात काेराेनाचा कहर
बुलडाणा : शहर व तालुक्यात काेराेना संसर्ग वाढतच असून, शुक्रवारी १८६ रुगणांची भर पडली आहे, तसेच बुलडाणा शहरातील ५५ वर्षीय महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहर व तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
५०१ बाधितांचा मृत्यू
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच आहे, तसेच काेराेनाने मृत्यू झालेल्याची संख्या ५०० वर पाेहोचली आहे. शुक्रवारी आणखी ९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचा आढावा
बुलडाणा : खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने प्रस्तावित प्राणवायू प्रकल्पाचा जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आढावा घेतला, तसेच रुग्णालयातील कोविड वार्ड, डायलेसीस विभाग, पाकगृह, कोविड प्रयोगशाळा आदींची पाहणी केली.
महाडीबीटीवर अर्ज करण्यास मुदतवाढ
बुलडाणा : सन २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके, गळीत धान्य व व्यापारी पिके अंतर्गत खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनिकिट या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी २० मे, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.