शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
2
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
3
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
4
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
5
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
6
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
7
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
8
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
9
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
10
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
11
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
12
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
13
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
14
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
15
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
16
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
17
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
18
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
19
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार

चार वाहनांच्या विचित्र अपघातात तीन मजूर जागीच ठार

By अनिल गवई | Published: May 06, 2023 11:44 PM

एक गंभीर, देऊळगाव साकरशा पारखेड फाट्यानजीकची घटना

खामगाव (बुलढाणा) : दुचाकीसह प्रवासी कार, मालवाहू वाहन आणि आणखी एका अशा एकूण चार वाहनांच्या विचित्र अपघातात तीनजण जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना देऊळगाव साकरशा पारखेड फाट्यानजीक रात्री ९:३० वाजताच्या दरम्यान घडली. जखमींना खामगाव, छत्रपती संभाजीनगर आणि अकोला येथे हलविण्यात आले.

देऊळगाव साकरशा पारखेड फाटानजीक असलेल्या एका वीटभट्टीवर तीन मजूर दुचाकीने जात होते. त्याचवेळी एका पाठोपाठ एक अशा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात अनियंत्रित झालेल्या एका वाहनाने तिघांना जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघेही फेकले गेल्याने तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. लक्ष्मण सीताराम गवळी (वय ४५), इरफान शेख हुसेन (वय ३८), सचिन नहार (वय २८) सर्व राहणार देऊळगाव साकरशा अशी मृतांची नावे आहेत. अपघातातील गंभीर जखमींना सुरुवातीला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र प्रकृती अत्यवस्थ झालेल्या मालवाहू वाहनातील एजाज दिलावर पठाण या गंभीर जखमीला अकोला येथे हलविण्यात आले.

प्रवासी कारमधील काहीजणांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच जानेफळ पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले; मात्र तत्पूर्वीच रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी मिळेल त्या वाहनाने जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविले. हा अपघात नेमका कशामुळे घडला याबाबत निश्चित कारण समोर आले नसले तरी, अनियंत्रित झालेली एम एच ०४ जीई ८७१२ क्रमांकाची प्रवासी कार दुचाकीवर येऊन आदळली. त्याचवेळी मालवाहू वाहन क्रमांक एमएच २८ ए बी ४३९६ या वाहनालाही प्रवासी कारने धडक दिली. वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला. या चालकाला सुरुवातीला खामगाव आणि नंतर अकोला येथे हलविण्यात आले. चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच रुग्णांच्या मृतांच्या नातेवाइकांनी सामान्य रुग्णालयात धाव घेत एकच आक्रोश केला.

टॅग्स :Accidentअपघात