बुलडाणा : गेल्या चार दिवसांत सहाजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर शनिवारी पुन्हा तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना मृत्यूचा दर सध्या १.१७ वर स्थिर असला, तरी गेल्या पाच दिवसांत नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वास्तव आहे. परिणामी संभाव्य दुसऱ्या लाटेचा विचार करता, संसर्ग टाळण्यासाठी अधिक सतर्कता गरजेची झाली आहे. दुसरीकडे कोरानाचा २० फेब्रुवारीचा पॉझिटिव्हिटी रेट २१ टक्क्यावर असून, एकूण २१५ जण बाधित आढळून आले आहेत.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेंट टेस्ट कीटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण १०३० जणांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यापैकी २१५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर ८१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा २९, पोखरी एक, केसापूर चार, दुधा एक, करडी दोन, शेगाव ११, घाणेगाव एक, सुटाळा बु. एक, खामगाव ३६, नांदुरा दोन, पोटळी तीन, पळशी एक, सोनाळा एक, हातणी दोन, किन्होळा तीन, टाकरखेड हेलगा एक, खैरव दोन, चांधई एक, अंत्री एक, पळसखेड एक, गोद्री तीन, पेनसावंगी एक, जांभोरा एक, अंचरवाडी एक, पिंपळगाव सोनाळा एक, मरखेडा दोन, दे. घुबे एक, वळती एक, चिखली २३, मलकापूर २६, उमाळी एक, सारोळा मारोती एक, सारोळा पीर एक, दे. राजा सात, डोढ्रा एक, सिनगाव जहागीर एक, अंढेरा एक, कळमेश्वर एक, डोणगाव एक, जानेफळ सहा, बऱ्हाई तीन, मेहकर दोन, सिं. राजा एक, शेंदुर्जन एक, सावरगाव एक, आसलगाव तीन, झाडेगाव दोन, लोणार दहा, पिंपळखुटा एक, सोनुना एक, अैारंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथील एक, अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार येथील एक याप्रमाणे कोरोना बाधितांची संख्या आहे.शनिवारी सिंदखेड राजा तालुक्यातील सावळा येथील ७० वर्षीय व्यक्ती, चिखली तालुक्यातील केळवद येथील ७५ वर्षीय व्यक्ती आणि चिखली शहरातील एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत एक लाख १९ हजार १९६ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर १४ हजार ४९६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे आणखी तीन बळी, २१५ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 11:18 AM