बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५,४३५ जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. यापैकी ७३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर ४,७०३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीही जिल्ह्यात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात २३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ९२, धाड ४, सुंदरखेड ३, डोंगरखंडाळा २, सागवन ४, बिरसिंगपूर ३, कोलवड ४, मलकापूर १३, दसरखेड ४, लासुरा २, पिंपळखुटा ५, निंबारी ३, देवधाबा २, वाघुड ३, चिखली ६३, मेरा २, सवणा २, अमडापूर २, हातणी २, सोनेवाडी २, येवता ७, इसोली २, उंद्री २, मोताळा २३, लिहा बु ३, गुळभेली २, परडा ७, पिं. देवी ३, जळगाव जामोद ५, आडोळ ३, मानेगाव ५, गोळेगाव खु. २, आसलगाव ८, दे. राजा ७, पाडळी शिंदे २, दे. मही ७, सिं. राजा २, साखरखेर्डा २, दत्तपूर ५, आडगाव राजा २, सावरगाव माळी २, देवखेड २, संग्रामपूर ३, सोनाळा २, बावनबीर ४, पातुर्डा ३, वानखेड ३, वरवट ४, उकडगाव २, शेगाव ४६, लोहारा २, जवळा २, खामगाव ९२, जनुना २, सुटाळा ६, जानेफळ २, वर्दडी वैराळ ३, हिवरा आश्रम ११, रत्नापूर ५, बाभूळखेड २, उकळी ५, कळमेश्वर २, जयताळा ३, दे. माळी ६, मेहकर २१, नांदुरा ४, हिंगणा २, शेंबा ३, खैरा २, टाकरखेड ३, टाकळी वतपाळ २, चांदुर बिस्वा ३, धानोरा ४, सुलतानपूर २, पळसखेड २, देऊळगाव २, बोरखेडी ५, देऊळगाव वायसा १४, खळेगाव ६, लोणार २० आणि जालना व पारध, वालसावंगी, जाफ्राबाद, सोनखेड येथील प्रत्येकी १, अकोला जिल्ह्यातील तुळजा खु., खोगी येथील प्रत्येकी १, जळगाव जिल्ह्यातील फर्दापूर, यावल येथील प्रत्येकी १, रिसोड १ आणि अमरावती येथील एकाचा यात समावेश आहे.
दरम्यान, देऊळगाव राजातील संजय नगर येथील ५० वर्षीय महिला, बुलडाण्यातील ७५ वर्षीय पुरुष आणि मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे ३८७ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
--सक्रिय रुग्ण ५ हजारांच्या टप्प्यात--
जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजारांच्या टप्प्यात आली असून सध्या ४,८०२ सक्रिय रुग्ण आहेत. एकूण रुग्णांची संख्या २८ हजार ५३७ झाली असून, त्यापैकी २३ हजार ५०३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अद्यापही ४,२०२ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्यांपैकी १ लाख ७७ हजार १५४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.