- अनिल उंबरकारलोकमत न्युज नेटवर्कशेगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील उपसभापतीसह आणखी तीन संचालक अपात्र झाले आहेत. त्यामुळे सभापती गोविंदराव मिरगे यांच्या पाठोपाठ भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे निवडून आलेले सर्व संचालक अपात्र घोषित झाले आहेत. सध्यस्थितीत कृउबास मध्ये जेष्ठ नेते पांडुरंगदादा पाटील यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलचे सभापती श्रीधर उन्हाळे यांच्यासह १० संचालक कार्यरत आहेत.कृउबास उपसभापती सुनिल वानखडे, संचालक देवानंद घुईकर, पुष्पा राजेश शेजोळे हे ग्रामपंचायत सदस्य होते. ग्रामपंचायत मतदार संघातून कृउबासमध्ये ते निवडून आले होते. मात्र ऑगस्ट २०२० मध्ये सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्याने तिघांनी ग्रामपंचायतीची पुन्हा निवडणूक लढविली. त्यामध्ये पराभूत झाले. यासंदर्भात वेगवेगळ्या व्यक्तीनी आक्षेप घेतले. त्यामुळे मुळ ग्रामपंचायत सदस्यत्वच नसल्याने त्यांचे कृउबास संचालक पद रद्द झाले. जिल्हा उपनिबंधक आर.एल.राठोड यांनी त्यांच्या अपात्रतेचा आदेश दिला.चार वर्षापूर्वी भाजप परिवर्तन पॅनलचे माजी कृउबास सभापती गोविंदराव मिरगे, अनुपमा मिरगे, देवेंद्र हेलगे आत्माराम महाले, रूपाली बोरडे, विठ्ठल भांबेरे, शेख नजीर, देवानंद घुईकर, पुष्पा राजेश शेजोळे तर पूर्वी परिवर्तन पॅनलमधे नंतर सहकार पॅनेलमध्ये प्रवेश घेऊन उपसभापती झालेले सुनील वानखडे असे एकूण १० सदस्य आतापर्यंत अपात्र झाले आहेत.
शेगाव बाजार समितीमधील आणखी तीन संचालक अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 11:10 AM