हर्षनंदन वाघ/ बुलडाणा : आपत्तीग्रस्त शेतकर्यांसाठी पशुपालनाच्या तीन नव्या योजना शासनाने सुरू केल्या आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट असून, या योजनेबाबत जनजागृती न झाल्यामुळे याबाबत अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत. शेतकर्यांच्या हितासाठी या योजनेबाबत जनजागृती करून, योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरत आहे. राज्यात नैसर्गिक आपत्ती व दुष्काळामुळे चाराटंचाई निर्माण झाल्याने शेतकरी पशुपालन व्यवसायाकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे पशुपालनास प्रोत्साहन मिळावे, पशुव्यवसायाकडे शेतकरी वळावा, यासाठी शासनाने तीन नव्या योजना १ जुलैपासून सुरू केल्या होत्या. राज्यशासनाकडून सहा दुधाळ गाई, म्हशी गट वाटप, ५0 टक्के अनुदानातून शेळी गटाचे वाटप तसेच ५0 टक्के अनुदानातून मांसल कुक्कुट पक्षी पालन योजनोचा यामध्ये समावेश आहे. यासाठी दारिद्रय रेषेखालील, बचतगट, बेरोजगार यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी १ जुलै २0१५ पासून सुरू करण्यात आली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ ऑगस्ट २0१५ आहे. योजना सुरू झाल्यानंतर जवळपास दीड महिन्याच्या कालावधीत या योजनेबाबत पुरेसी जनजागृती न केल्यामुळे अनेक शेतकरी योजनांपासून वंचित आहेत. या योजनांची माहिती अनेक शेतकर्यांपर्यंंत पोहचलीच नसल्याने, मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.*शेतकर्यांना मार्गदर्शनाची गरजमान्सूनचा पाऊस झाल्यानंतर पावसाने जवळपास दीड महिना दडी मारली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. अशा परिस्थितीत शेतकर्यांना शासनाच्या या योजनांबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचा पशुपालन व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. त्यामुळे पशुपालन व्यवसाय वाढण्यास मदत होईल.
पशुपालनाच्या तीन नव्या योजनांना हवी मुदतवाढ
By admin | Published: August 10, 2015 11:08 PM