सोयाबीन पिकावर औषध फवारणी
धामणगाव धाड : जिल्ह्यासह परिसरात सततच्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. शेतकरी महागडी औषधी कीटकनाशके फवारणी करून पिकांना अळीपासून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आरोग्य सुविधांसाठी तत्परता
बुलडाणा : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता शहरांप्रमाणेच चांगल्या आरोग्य सुविधा ग्रामीण भागातही असल्या पाहिजेत, यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून एका बैठकीत देण्यात आली.
बीज प्रक्रिया अभियानाला ९० टक्के प्रतिसाद
बुलडाणा : कृषी विभागाने घरचे बियाणे वापरणे, उगवण क्षमता चाचणी घेणे व बीज प्रक्रिया मोहीम राबवून त्याचे महत्व शेतकऱ्यांना पटल्यामुळे नांद्रा कोळी येथील जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून सोयाबीन बियाणे पेरणी केलेले आहे. या अभियानात यंदा शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
लसीकरणाला प्रतिसाद
बुलडाणा : जिल्ह्यामध्ये २२ जूनपासून कोविडची १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या लसीकरण मोहिमेस पाच आरोग्य संस्थांमधून सुरुवात करण्यात आली आहे. सध्या लसीकरण मोहिमेला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.