प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण १ हजार ८५४ जणांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ८५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये चिखली तालुक्यातील मंगरुळ येथील एक, संग्रामपूरमधील पिंप्री येथील १ आणि जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील वरूड येथील एकाचा समावेश आहे. दुसरीकडे २० रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
दुसरीकडे आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ६ लाख ६५ हजार ३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजपर्यंत ८६ हजार ६४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्यापही १ हजार ४४० संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८७ हजार ३५४ झाली असून, त्यापैकी ४२ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. दरम्यान, ६७२ जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.