शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

बुलडाणा जिल्ह्यात वर्षाकाठी तीन हजारावर क्षयरुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 5:14 PM

बुलडाणा: जिवाणूजन्य आजार असलेला क्षयरोग २०२५ पर्यंत नष्ट कण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. त्यानुसार सर्वत्र क्षयरोग निर्मुलनाची मोहीम सध्या सुरू आहे.

बुलडाणा: जिवाणूजन्य आजार असलेला क्षयरोग २०२५ पर्यंत नष्ट कण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. त्यानुसार सर्वत्र क्षयरोग निर्मुलनाची मोहीम सध्या सुरू आहे. जिल्ह्यात वर्षाकाठी तीन हजार ते ३ हजार १५६ क्षयरुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार केले जात असून त्यासाठी जिल्ह्यामध्ये एकूण १३ पथक कार्यरत आहेत. क्षयरोग हा इतर आजारासारखाच असून तो मायक्रोबॅक्टेरियम टुबरक्युलोसिस नावाच्या जंतूमुळे होणारा आजार आहे. त्याचा संसर्ग हवेतून क्षयरुग्णांच्या खोकल्याद्वारे, शिंकल्याद्वारे इतरांना होवू शकतो. त्यावर लवकरच निदान करून उपचार घेणे हा एकमेव पर्याय आहे. २०२५ पर्यंत क्षयरोग नष्ट करण्याच्या उद्दिष्ट पुर्तीसाठी सध्या जिल्हा क्षयरोग विभागाकडून काम चालू आहे. क्षयरोग निर्मुलनासाठी जिल्ह्यातील १३ तालुक्यात १३ पथक कार्य काम पाहत आहेत. क्षयरुग्णांवर वेळीच निदान व उपचार व्हावा, यासाठी बुलडाणा ेथे एक जिल्हा क्षयरोग केंद्र आहे. तेथे जिल्हा क्षयरोग अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, डी. पी. सी., डी. पी. एस., डी. ई. ओ लेखापाल आदी कर्मचारी काम पाहतात. जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिन्याला अंदाजे शासकीय रुग्णालयातून १५३ व खाजगी डॉक्टरांकडून ११० असे एकुण जवळपास ६३ नवीन टिबीचे रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार केले जातात. दरवर्षी एकूण तीन हजारावर टिबीचे रुग्ण शोधुन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. 

 आज जागतिक क्षयरोग दिनडॉ. रॉबर्ट कॉक यांनी १८८२ साली क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास २४ मार्च रोजी मान्यता मिळाली. त्यामुळे दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. 

 ‘इट्स टाईम’जागतिक क्षयरोग दिन २०१९ चे घोषवाक्य ‘इट्स टाईम’ (हीच वेळ आहे) असे ठेवण्यात आले आहे. दरवर्षी २४ मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त एक विशेष घोषवाक्य तयार करण्यात येते. यादिवशी क्षयरोग निर्मुलनासाठी आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात येते. रुग्णांना वेळेवर उपचार घेण्यासाठी जागृत केल्या जाते. 

 हजारे रुग्णांची सिबीनॅटवर तपासणीजिल्ह्यामध्ये मार्च २०१६ पासून क्षयरोगाचे निदान करण्यासाठी अत्याधुनिक सिबीनॅट मशीन उपलब्ध आहे. जिल्हा क्षयरोग केंद्रामध्ये या मशीनद्वारे क्षयरोग तसेच एमडीआर रुग्णांचे निदान करण्यात येते. २०१८ मध्ये एकुण १ हजार ३४७ रुगणांची सिबीनॅट वर तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६६७ रुग्ण टिबीचे तर ४० रुग्ण एमडीआरचे आढळुन आलेत. 

 जिल्ह्यात क्षयरुग्णांचे प्रमाण अलिकडील काळात घटले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण २६ डीएमसी मान्यताप्राप्त सुक्ष्मतादर्शक केंद्र आहेत. तेथे थुंकीनमुन्याची तपासणी करून क्षयरोगाचे निदान करण्यात येते. क्षयरुग्णांची तपासणी मोफत आहे. तसेच सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सर्व क्षयरुग्णांना पोषण आहार घेण्याकरीता दरमहा ५०० रुपये देण्यात येतात. - डॉ. मिलींद जाधव,जिल्हा क्षयरोग अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य