खामगाव : गत अनेक वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षा भाजपच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात शेतकºयांची तिप्पट प्रगती झाली आहे. ही प्रगती केवळ कागदावरच नव्हे, तर ती दृष्य स्वरुपात आहे. भाजपच्या सरकारने शेतकºयांसाठी काँग्रेसच्या सरकारपेक्षा तिप्पट आर्थिक तरतुद केल्यामुळे हे शक्य झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केला. काँग्रेसच्या कार्यकाळात २० ते २२ हजार कोटी तरतुद असायची, ती आता ६६ हजार कोटी रुपयांवर गेली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपला मुद्दा स्पष्ट करताना सांगितले.शासकीय योजनांची माहिती शेतकºयांपर्यंत पोहचवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात चार दिवसीय पश्चिम विदभार्तील सर्वात मोठा कृषी महोत्सवा चे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महोत्सवात फडणवीस बोलत होते. यावेळी मंचावर कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, खा. प्रतापराव जधाव, खा. रक्षा खडसे, आमदार आशिष शेलार, आ.संजय रायमूलकर, खामगाव मतदार संघाचे आमदार अॅॅड. आकाश फुंडकर, आ.डॉ संजय कुटे, शशीकांत खेडकर, जि. प. अध्यक्षा उमा तायडे, डॉ. पंदेकृविचे कुलगुरू विलास भाले, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. वेंकटेश्वरलु यांचेसह आमदार, खासदार यांचेसह भाजपचे सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि, भाजप सरकारने शेतकºयांच्या हितासाठी विविध योजना आणल्या आहेत. शेतकºयांना यावेळी देण्यात आलेली कर्जमाफी ही मागच्या सरकारपेक्षा शेतकºयांसाठी जास्त फायदेशीर ठरल्याचा दावाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. आॅनलाईन कर्जमाफीमुळे सरकारवर टीका झाली असली, तरी यामुळे बँकांची बदमाशी व मध्यस्थांची दुकानदारी बंद करण्यात सरकारला यश आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमुद केले. सरकारची मदत थेट शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मागच्या कर्जमाफीत संपूर्ण विदर्भासाठी २५० कोटी मिळाले, तर यावेळच्या कर्जमाफीत एकट्या बुलडाणा जिल्ह्यासाठी ११०० पेक्षा अधिक रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
काँग्रेसपेक्षा भाजपच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची तिप्पट प्रगती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 1:51 PM
खामगाव : काँग्रेसच्या कार्यकाळात २० ते २२ हजार कोटी तरतुद असायची, ती आता ६६ हजार कोटी रुपयांवर गेली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपला मुद्दा स्पष्ट करताना सांगितले.
ठळक मुद्देपश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या कृषी महोत्सवाचे खामगावात उदघाटन.कर्जमाफी ही मागच्या सरकारपेक्षा शेतकºयांसाठी जास्त फायदेशीर ठरल्याचा दावाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. खामगाव शहरात टेक्सटाइल पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.