खामगाव : तालुक्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक होत असल्याने तहसीलदार आकाश लिगाडे यांनी रेती व मुरूम घेऊन जाणारी तीन वाहने पकडली असून, वाहन मालकांकडून दंड वसूल केला आहे. पिंप्री देशमुख शिवारातून अवैधरीत्या १ ब्रास मुरूम घेऊन जाणारे टिप्पर क्र.एमएच २८-एबी ७२६२ पकडून टिप्परमालक शे.हमीद शे.गफ्फार यांच्याकडून ३२00 रु पये दंड वसूल केला. येथूनच तीन ब्रास मुरूम घेऊन जाणारे टिप्पर क्र.एमएच २८- ७२८१ ला पकडून मालक संतोष कणीकर यांना ९ हजार ७00 चा दंड आकारण्यात आला. तर खोलखेड येथून दीड ब्रास रेती वाहतूक करणारे विना क्रमांकाचे टिप्पर पकडले व टि प्परचालक अविनाश काळे यांच्याकडून ९ हजार ३00 रुपयांचा दंड वसूल केला.
गौण खनिजाची तीन वाहने पकडली
By admin | Published: May 15, 2015 12:57 AM