रोहेरी बु (बुलडाणा) : पोहण्यासाठी बंधाºयावर गेलेले तीघे बुडाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील चांगेफळ येथे घडली. यातील एकाचा मृतदेह सापडला असून दोघे बेपत्ता आहेत. वृत्त लिहीस्तोवर त्यांचा ग्रामस्थ शोध घेत होते. सिंदखेड राजा तालुक्यातील चागेफळ येथे सोमवारी सकाळी ८ वाजता गावातील काही तरूण नविन्याचे बांधण्यात आलेल्या बंधाºयात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने गंगाराम उर्फ ( कैलाश) शांतिराम भालेराव (३०) हां तरुण बुडाला. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी सोबत असलेले ज्ञानेश्वर धोंडीराम भालेराव (२२) व त्यांच्या घरचा पाहुणा मुलगा बाळू सुरेश बांगर कानडी ता, मंठा जि.जालना यांनी प्रयत्न केला. मात्र, तिघेही खोल पाण्यात गेल्याने बुडाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह प्रशासनाने घटनास्थळावर धाव घेउन शोध मोहिम सुरू केली. यापैकी कैलास उर्फ गंगाराम भालेराव याचा मृतदेह शोधण्यात ग्रामस्थ व प्रशासनाला यश आले. तर इतर दोघांना शोधण्यासाठी मोहिम सुरू होती.
पोहण्यासाठी गेलेले तिघे बंधाऱ्यात बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 3:53 PM