शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

Tiger in Khamgaon: खामगावात वाघाची दहशत, वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2021 9:07 PM

खामगाव शहरातील केशवनगर भागातील स्मशानभूमी परिसरात झाडेझुडपे आहेत. या परिसरातील राजपूत यांच्या घरामध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये घरासमोरून रस्त्यावर वाघ चालत गेल्याचे दृश्य कैद झाले.

खामगाव : शहरातील मध्यभागी भरवस्तीत शनिवारी पहाटे अनेकांना वाघाचे दर्शन झाले, त्यामुळे दिवसभर नागरिकांमध्ये दहशत होती. वनविभागाच्या वतीने रात्री उशिरापर्यंत वाघाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. शनिवारची रात्र खामगावकरांसाठी भीतीदायक ठरली. कुणीही घराबाहेर न निघण्याचे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोहर अकोटकर यांनी केले आहे.

खामगाव शहरातील केशवनगर भागातील स्मशानभूमी परिसरात झाडेझुडपे आहेत. या परिसरातील राजपूत यांच्या घरामध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये घरासमोरून रस्त्यावर वाघ चालत गेल्याचे दृश्य कैद झाले. याचवेळी याच भागातील महिलेनेही वाघ बघितला. ही वार्ता शनिवारी सकाळी शहरात वाऱ्यासारखी पसरली. मात्र, तो वाघ आहे की बिबट्या हे स्पष्ट होऊ शकले नाही. शहरात दिवसभर वाघाची चर्चा असतानाच पाच वाजण्याच्या दरम्यान केशवनगर भागात असलेल्या झुडपांमध्ये वाघ असल्याची माहिती काही नागरिकांनी वनविभागाला दिली. या भागात वनविभाग व पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी पोहोचले. तसेच या ठिकाणी बघ्यांचीही गर्दी झाली. पोलिसांनी रस्ता बंद करून नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. पाच वाजतापासून ते रात्री १० वाजेपर्यंत या ठिकाणी वनविभाग, पोलीस व महसूलचे अधिकारी उपस्थित होते. वाघाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

शहरातील भरवस्तीत वाघ आला कसा? याचाही शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.

वाघ की बिबट्या?शहरातील अनेक नागरिकांनी वाघाला पाहिले असल्याचे सांगितले. वनविभागालाही त्यांनी तशी माहिती दिली. मात्र, तो वाघ आहे की बिबट्या आहे, हे वनविभाग निश्चित करू शकला नाही.हाच सी वन वाघ?ज्ञानगंगा अभयारण्यात काही दिवसांपूर्वी सी वन वाघ होता. त्या वाघाला कॉलर आयडी होता. मात्र, गत काही दिवसांपासून तो सी वन वाघ बेपत्ता झाला. त्याचा पत्ता लागत नाही. तो वाघ खामगावातील असल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना इशाराखामगाव शहरातील मढी, सुटाळपुरा, सिंधी कॉलनी, सिव्हिल लाईन, महाकाल चौक, डीपी रोड, फरशी, लायन्स ज्ञानपीठापर्यंत रहिवासी नागरिकांनी मॉर्निंग वॉक करताना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Tigerवाघ