लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरालगतच्या हनवतखेड परिसरात व लगतच्या अजिंठा पर्वत रांगामध्ये वाघाची भटकंती होत असल्याची चर्चा बुलडाणा शहरत होत असून २० डिसेंबर रोजी काहींनी या वाघाला प्रत्यक्ष बघितल्याचाही दावा करण्यात येत आहे. दरम्यान हनवतखेड परिसरातील एका गव्हाच्या शेतात वाघाच्या पायाचा ठसाही आढळून आल्याचा दावा केला जात आहे.दरम्यान, अजिंठा पर्वत रांगातही अलिकीडल काळात वाघ भटकंती करीत असल्याची चर्चा असली तरी प्रादेशिक वनविभागाकडून याची अद्याप पृष्टी करण्यात आलेली नाही. मलकापूर नाका परिसरात राहणाऱ्या काही शेतकऱ्यांना हनवतखेड शिवारत असलेल्या डंपींग ग्राऊंड परिसरालगत वाघ दिल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याच्या पृष्ठ्यर्थ गव्हाच्या शेतात वन्यप्राण्यांचा आढळेला ठसाही दाखविल्या जात आहे. नाही म्हणायला ज्ञानगंगा अभयारण्यात टी-१ सी-१ वाघ डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाखल झाला होता. त्यामुळे सध्या बुलडाणा जिल्ह्यात घाटावरील भागात वाघाची चर्चा सार्वत्रिक स्वरुपात होत आहे. आता तर तो बुलडाणा शहराच्या वेशीवर आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र वनविभागाकडून यास अद्याप अधिकृतस्तरावर पुष्टी मिळालेली नाही. दुसरीकडे ज्ञानगंगा अभयारण्यात असलेला टी-१ सी-१ वाघ हा मधल्या काळात बोरखेड शिवारात दिसल्याचेही वन्यजीव विभागाच्या सुत्रांनी सांगितले. हनवतखेड शेत शिवाराता वाघ असल्याची अद्याप पुष्टी झालेली नाही. प्रादेशिक वनविभागाच्या अधिकाºयांनी या भागात २० डिसेंबर रोजी पाहणी केली नाही.- गणेश टेकाळे, आरएफओ, बुलडाणा.