लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाह रस्ता ओलांडतांना अपघातामध्ये वन्यप्राण्यांना इजा होऊ नये, या दृष्टीकोणातून वन्यजीव विभागाने ‘वाघाचे पगमार्क स्पीड ब्रेकर’ ही एक नवी संकल्पना राबविण्यास प्रारंभ केला आहे.ज्ञानंगगा अभयारण्यातून २० किमी गेलेल्या बुलडाणा-खामगाव मार्गावर जवळपास पाच ठिकाणी वन्यजीव साधारणत: रस्ता ओलांडत असतात. अशा पाच ठिकाणी सध्या हे पगमार्क स्पीड ब्रेकर लावण्यात येत आहे. सध्या दोन ठिकाणी ते तयार करण्यात आले असून आणखी तीन ठिकाणी ते लावण्यात येणार असल्याची माहिती वन्यजीवचे बुलडाणा विभागाचे आरएफओ मयुर सुरवशे यांनी दिली.बुलडाणा शहरालगतच १४ किमी अंतरावर बुलडाणा, चिखली, खामगाव आणि मोताळा तालुक्याच्या सीमावर्ती भागात २०५ चौरस किमी क्षेत्र व्यापलेले ज्ञानगंगा अभयारण्य आहे. या अभियारण्यातील मार्गावर गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत चार बिबट वाहनाच्या धडकेत ठार झालेले आहेत. यात एक मादी बिबटाचाही समावेश होता. गर्भवती असलेल्या या मादी बिबटाच्या पोटात चार पिल्लेही होती. त्यांचाही दुर्देवाने मृत्यू झाला होता. त्या पृष्ठभूमीवर वन्यजीवांचे संरक्षण व्हावÞे म्हणून ही उपाययोजना करण्यात येत आहे. मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पातंर्गतही हे पगमार्क काही ठरावीक रस्त्यांवर लावण्यात येत आहेत.
‘ज्ञानगंगा’त वाघाचे पदचिन्ह लावणार वाहनाच्या वेगाला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 3:57 PM