वरवटबकाल (ता. संग्रामपूर) : अच्छे दिनचे स्वप्न दाखवणा-या भाजपा सरकारने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले आहे. एवढेच नाहीतर देशाचा पोशिंदा असलेल्या शेतक-याला न्याय देण्याऐवजी आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा टीका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा बुलडाणा जिल्ह्यात दाखल शनिवारी दाखल झाली. ही जनसंघर्ष यात्रा दुपारी ४.३० वाजता वरवटबकाल येथे दाखल झाली. यानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुकुलजी वासनिक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खा.अशोक चव्हाण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान सभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे,महाराष्ट सहप्रभारी आशिषजी दुआ,आ.वजाहत मिर्जा,आ.अब्दुल सत्तार,जिल्हा अध्यक्ष आमदार राहुल बोन्द्रे,आ. हर्षवर्धन सपकाळ, (अखिल भारतीय कॉग्रेस सरचिटणीस)प्रदेश सरचिटणीस अॅड, गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस शामभाऊ उमाळकर, मदन भरगड, संजय राठोड, विजय अंभोरे,यांच्यासह राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते तसेच जळगाव जामोद मतदार संघातीलपदाधिकारी सह बुलढाणा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर उपस्थित होते. यापुढे पुढे बोलतांना विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. मोदी सरकारला जनशक्तीची ताकद आपल्या मतदानातून दाखवण्याची वेळ आली आहे. या सरकारने हा देश पोखरून काढला आहे. जलयुक्त शिवार फक्त नावालाच असल्यामुळे या योजनेबाबत कोटी रुपयांची उलाढाल केली. ही रक्कम शेतक-यांच्या घामाची असून शेतक-यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासनही सरकार पूर्ण करू शकले नाही. सरकार भगवान रामाच्या नावाचा राजकारण करीत असून जातीय आरक्षणाबाबत कुठलाही ठोस निर्णय न घेता त्यावर केवळ राजकारण केल्या जात असल्याचे विखे पाटील म्हणाले. राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे संग्रामपूर तालुक्यात सोनाळा येथे दाखल होताच येथील कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतीषबाजीत स्वागत केले. दरम्यान काटेल येथे संत गुलाब बाबा यांच्या पादुकांचे दर्शन घेतले.
भाजपाने आणली शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ - राधाकृष्ण विखे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 7:26 PM