खामगाव, दि. २३- शहर व परिसरातील जगदंबा (शांती) उत्सवाची सांगता सोमवारी विसर्जन मिरवणुकीने होणार असून, मिरवणुकीच्या अनुषंगाने शहरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यावर्षी शहर व परिसरात ७८ सार्वजनिक जगदंबा उत्सव मंडळांकडून कोजागिरी पौर्णिमेपासून जगदंबा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाची सांगता २४ ऑक्टोबर रोजी होत आहे. यानिमित्ताने शहरातील प्रमुख मार्गावरून विसर्जन मिरवणूक निघणार आहे. यावेळीही डी.जे. वाजविण्याला बंदी असून, रात्री १0 वाजे पर्यंंंतच वाद्य वाजविता येणार आहे. या मिरवणुकीच्या अनुषंगाने सुमारे ८00 कर्मचार्यांचा तगडा पोलीस बंदोबस्त लावण्या त आला आहे. यासाठी रविवारी शहर पोलीस स्टेशनच्या आवारात अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी रुपाली दरेकर यांनी बंदोबस् तावरील पोलीस कर्मचार्यांना सूचना दिल्या. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी.डी. ढाकणे, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले, ग्रामीण पो.स्टे.चे ठाणेदार शिंदे, शेगाव ग्रामीणचे ठाणेदार डाबेराव आदींसह बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान उपस्थित होते.
जगदंबा मातेची आज विसर्जन मिरवणूक
By admin | Published: October 24, 2016 2:43 AM