लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कर्मचार्यांना पेंशन योजना लागू व्हावी अशी तरतूद घटना निर्मितीच्या वेळी केली आहे; परंतु शासन वेगवेगळे शासन निर्णय काढून कर्मचार्यांची ही शिदोरी हिरावून घेऊ पाहत आहे. १ नोव्हेबर २00५ पूर्वीच्या व नं तरच्याही शिक्षक व इतर सर्व कर्मचार्यांना जुनीच पेंशन योजना लागू व्हावी यासाठी १५ सप्टेंबर रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.जुनी पेंशन योजना कर्मचार्यांच्या भाविष्यची तरतूद असून, शासन स्वत:च्या सोईसाठी वेगवेगळे शासननिर्णय काढून शिक्षक व इतर सर्व कर्मचारी यांना वेठीस धरत आहे. जुनी पेंशन योजना व नवीन अंशदायी पेंशन योजना यामधे बरीच तफावत असून, नवीन अंशदायी योजना कर्मचार्यांना हि तावह नाही. जुनी पेंशन योजना लागू नसल्यामुळे मरण पावलेल्या शिक्षकांच्या पाल्यांची हेळसांड होत आहे. अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. शिक्षक व इ तर सर्व कर्मचारी यांना त्यांचे न्याय हक्क मिळण्यासाठी १ नोव्हेंबर २00५ पूर्वीच्या व नंतरच्याही शिक्षक व इतर सर्व कर्मचार्यांना तसेच मृत पावलेल्या शिक्षकांच्या पाल्यांना जुनी पेंशन योजना लागू होण्यासाठी शिक्षक महासंघ सर्व आमदार यांना सोबत घेऊन जुन्या पेंशन योजनेचा मुद्दा विधानसभा व विधान परिषदेतील बैठकीमधे ठराव घ्यायला लावण्याकरिता प्रयत्नशील राहील व या माहितीचा अहवाल राज्यपाल व मुख्य सचिव यांच्याकडे निवेदन देऊन अद्यादेश लागू करण्यासाठी पाठविण्याचा प्रयत्न करेल. तामिळनाडू राज्य सरकारने ज्याप्रमाणे आपल्या राज्यातील कर्मचार्यांना जुनी पेंशन योजना लागू केली, त्याच धर्तीवर ती महाराष्ट्रा तही लागू व्हावी, यासाठी या एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन आयोजित केले आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन अमरावती विभाग शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर आदींनी केले आहे.
पेंशनधारकांचे आज अन्नत्याग आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:58 PM
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कर्मचार्यांना पेंशन योजना लागू व्हावी अशी तरतूद घटना निर्मितीच्या वेळी केली आहे; परंतु शासन वेगवेगळे शासन निर्णय काढून कर्मचार्यांची ही शिदोरी हिरावून घेऊ पाहत आहे. १ नोव्हेबर २00५ पूर्वीच्या व नं तरच्याही शिक्षक व इतर सर्व कर्मचार्यांना जुनीच पेंशन योजना लागू व्हावी यासाठी १५ सप्टेंबर रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे २00५ पूर्वीच्या व नं तरच्याही शिक्षक व इतर सर्व कर्मचार्यांना जुनीच पेंशन योजना लागू व्हावी१५ सप्टेंबर रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार