ठळक मुद्देमुस्लीम पर्सनल लॉ कायद्यामध्ये परिवर्तन; नवीन कायद्याला विरोध बर्मा येथील रोहिंग्या मुसलमानावर होत असलेले अत्याचार थांबविण्यात यावेनगर परिषद उर्दू शाळा येथून निघणार मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: शासन मुस्लीम पर्सनल लॉ कायद्यामध्ये परिवर्तन करून नवीन कायदा अमलात आणत आहे. या नवीन कायद्याला विरोध करण्यासाठी तसेच बर्मा (म्यानमार) येथील रोहिंग्या मुसलमानावर होत असलेले अत्याचार थांबविण्यात यावे, यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. याकरिता मुस्लीम समाजाच्यावतीने १५ सप्टेंबर रोजी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा नगर परिषद उर्दू शाळा क्र.३ मेहकर येथून २ वाजता शांततेने निघणार आहे व शेवटी स्वातंत्र्य मैदान येथे जाहीर सभा होणार आहे. मूक मोर्चाला मुस्लीम समाजाच्या हजारो महिला व पुरुषांसह ग्रामीण व शहरी भागातील समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष कासम गवळी यांनी केले आहे.