शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

बुलडाण्यात टोमॅटोचा ‘लाल चिखल’, भाजीपाला उत्पादक शेतक-यांसाठी ‘स्वाभिमानी’ आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 7:05 PM

राज्यात भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजारात भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला उपटून फेकून देत आहेत. सोमवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर शेतकºयांनी दोन ट्रॉली टोमॅटो फेकून आपला संताप व्यक्त केला.

बुलडाणा - राज्यात भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजारात भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला उपटून फेकून देत आहेत. सोमवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर शेतकºयांनी दोन ट्रॉली टोमॅटो फेकून आपला संताप व्यक्त केला. यावेळी रविकांत तुपकर व जवळपास १०० शेतक-यांना पोलिसांनी अटक व सुटका केली. संतापलेल्या शेतक-यांनी टोमॅटोचा ‘लाल चिखल’ करून भाजप सरकारच्या विरोधात नारेबाजी करीत सरकारचा निषेध केला.मेहकर तालुक्यातील बोरी येथील संजाब आश्रु बचाटे या शेतक-याने शेतातील वांगी व टोमॅटोला बाजारात विक्रीसाठी नेले, मात्र बाजारात या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संतापलेल्या या युवा शेतक-यांने शेतातील वांगी व टोमॅटोची झाडे अक्षरशा: कु-हाडीने तोडून टाकली. या पार्श्वभूमीवर २६ मार्च रोजी शेतकºयांनी ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात दोन ट्रॉली टोमॅटो आणून लोकांना फुकट नेण्याचे आवाहन केले; मात्र शेतकºयांचा हा भाजीपाला कोणी फुकटही नेत नसल्याचेपाहून अखेर शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोमॅटो टाकून सरकारचा निषेध केला. ‘स्वाभिमानी’च्या या आनोख्या आंदोलनामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात टोमॅटो चा अक्षरश: सडा पडला होता.

हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्ते रविकांत तुपकर व शंभर शेतकºयांना ताब्यात घेतले. या आंदोलनात टोमॅटो उत्पादक शेतकरी मुधकर शिंगणे, स्वाभिमानीचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे पाटील, राणा चंदन, कैलास फाटे, भगवानराव मोरे, शे.रफीक शे.करीम, सतीश मोरे, दामोदर इंगोले, महेंद्र जाधव, निवृत्ती शेवाळे, नितीन राजपुत, अनिल वाकोडे, हरिभाऊ उबरहंडे, कडूबा मोरे, शे.सादिक, योगेश पायघन, अमिन खासब, अशोक मुटकुळे, सुधारक तायडे, सरदारसिंग इंगळे, मदन काळे, अमोल तेलंगरे,शशिकांत पाटील, दत्तात्रय जेऊघाले, शे.मुक्तार, मदन काळे, रामेश्वर परिहार, दीपक धनवे, भगतसिंग लोधवाळ, गोटु जेऊघाले, प्रेममसिंग धनावत, गणेश शिंगणे, डिंगाबर हुडेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित  होते.

टॅग्स :FarmerशेतकरीbuldhanaबुलडाणाMaharashtraमहाराष्ट्र