- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: तुरीचा हंगाम अंतीम टप्प्यात आला आहे. मात्र आतापर्यंत अनेक तलाठ्यांकडून सातबाºयावर तुरीची आॅनलाइन नोंदणीच करण्यात आलेली नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. सध्या तूर हमीभावाने विक्री करण्यासाठी आॅनलाइन नोंदणी सुरू आहे. शेतात तुरीची सोंगणी सुरू झाली; परंतू अनेकांच्या सातबाºयावर नोंदच नसल्याने हमीभावाच्या नोंदणीला अडचणी येत आहेत.राज्यात खरीप हंगाम २०१९-२० मध्ये प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण योजनेंतर्गत किमान आधारभूत हमीभावाने तूर खरेदीची केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, त्यांची आर्थिक उन्नती साधावी, यासाठी शासनाकडून हमीभाव ठरवून दिलेला आहे. मागील वर्षी शेतकºयांकडील तूर व हरभरा शासनामार्फत हमीभावाने खरेदी करण्यात आला होता. यावर्षी तुरीचा आधारभूत दर ५ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल आहे. केंद्रशासनाने जाहीर केलेल्या आधारभूत दराने तुरीची खरेदी करण्यासाठी १ जानेवारीपासून आॅनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू झाली आहे.शेतकºयांची ज्या तालुक्यात जमीन आहे, त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर त्यांची नोंदणी सुरू आहे.नोंदणीकरीता आधारकार्डची छायांकित प्रत, तूर पिकांची नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड संलग्न असलेल्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, तलाठ्याचे पीक पेरा पत्र आदी कागदपत्र सादर करावे लागतात. नोंदणी झालेल्या शेतकºयांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार माल आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येते. परंतू सध्या तूर खरेदी केंद्रावर सुरू असलेल्या आॅनलाइन नोंदणीसाठी विविध अडचणी निर्माण होत आहेत. त्यामध्ये प्रमुख्याने सातबारा उतारावर तूर पिकाची नोंद नसल्याने हमीभावाने तूर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी करणे अवघड झाले आहे.अनेक तलाठ्यांनी शेतकºयांच्या सातबाºयावर तूर पिकांची नोंद केलेली नसल्याचे प्रकार प्रत्येक तूर खरेदी केंद्रावर समोर येत आहेत. त्यामुळे शेतकºयांना नोंदणी न करताच परत जावे लागत आहे.
नोंदणीची मुदत महिन्याभरावरहमीभावाने तूर खरेदीसाठी १ जानेवारी २०२० पासून प्रत्येक तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी सुरू झाली असून, त्यासाठी १५ फेब्रुवारीची अंतीम मुदत देण्यात आली आहे. या महिन्याभरामध्ये सातबारावर पिकाची नोंद, तलाठ्याकडून पीक पेरा पत्र, बँक खात्याला आधार कार्ड संलग्न आदी बाबी पूर्ण करणे आवश्यक आहे.