शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस; खडकपूर्णाचे १९ दरवाजे दीड फुटाने उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 11:08 AM

Heavy rain in Buldhana District : खामगाव-चिखली, बुलडाणा-चिखली, मोताळा-नांदुरा हे मार्ग बंद पडले आहेत.

ठळक मुद्देपेनटाकळी प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्गपुरात दोघे वाहून गेले

बुलडाणा: जिल्ह्यात गेल्या १२ तापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून खामगाव-चिखली, बुलडाणा-चिखली, मोताळा-नांदुरा हे मार्ग बंद पडले आहेत. दुसरीकडे बुलडाणा तालुक्यातील नांद्रा कोळी येथील दोन जण पुराच्या पाण्यात बेपत्ता झालले आहे. यासोबतच खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्वच्या सर्व १९ दरवाजे दीड फुटापर्यंत (५० सेमी) उघडण्यात आले असून त्यातून ३७ हजार ९४० क्युसेक (१०७३ क्युमेक्स) आणि पेनटाकली प्रकल्पाचेही तीन दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यातून ४४.६५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.जिल्ह्यात सोमवारी रात्री ९ वाजल्यापासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे बुलडाणा, चिखली, मोताळा तालुक्यातील नदी-नाले एक झाले आहे. पैनगंगा नदीनेही पात्र सोडल्याने नदीकाठची शेती खरडून गेल्याची भीती व्यक्त होत आहे.

त्यातच बुलडाणा तालुक्यातील नांद्रा कोळी येथील नाल्याला आलेल्या पुरात २७ सप्टेंबर रोजी दोन जण वाहून गेले आहेत. जवळपास १०० मीटर अंतरावर या दोघांची दुचाकी आढळून आली आहे. बचाव पथक सध्या त्यांचा शोध घेत असून मंगळवारी सकाळी ११ वाजता बेपत्ता झालेल्या या दोघांपैकी एक जण सुखरूप सापडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. अन्य एकाचा शोध घेण्यात येत आहे.जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता पाहता २७ सप्टेंबर रोजीच जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. २६ सप्टेंबर रोजीही याबाबत प्रशासकीय पातळीवर सुचनाही देण्यात आल्या होत्या.

अद्यापही बुलडाणा जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून निर्माण झालेल्या पुर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील नळगंगा हा मोठा प्रकल्पही ७५ टक्क्यांपेक्षा अधिक भरला आहे. पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होत आहे.दुसरकीडे मध्यरात्री निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमुळे चिखली-बुलडाणा, नांदुरा-मोताळा आणि खामगाव-चिखली हा मार्ग पेठनजीक पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बंद झाला आहे. जिल्ह्यात पैनगंगा, विश्वगंगा नद्यांसह त्यांच्या काही उपनद्यांनाही पुर आला आहे. अद्यापही जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर