- देवेंद्र ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: तालुक्यातील आसलगाव येथील बाजारात शेतकऱ्यांच्या शेतमालाची हर्रासी करण्यासाठी मोठे टीन शेड उभारण्यात आले आहेत. परंतु याचा वापर प्रत्यक्ष व्यापारीच करीत असल्याचे दिसून येते. सर्वत्र व्यापाºयांच्या मालाचे पोते ठेवण्यात आले असून शेतकºयांना त्यांचा शेतमाल हर्रासीत मांडण्यासाठी फारच कमी जागा शिल्लक ठेवण्यात आली आहे. ही बाब लोकमत स्टींग आॅपरेशनमधून समोर आली आहे.जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत आसलगाव उपबाजार आहे. जळगाव जामोद तालुक्यात आसलगाव येथे दर मंगळवारी मोठा बाजार भरतो. तालुक्यात आसलगावचा बाजार धान्य व गुरांच्या बाजारासाठी प्रसिध्द आहे. तालुक्यातून तसेच तालुक्याबाहेरूनही शेतकरी येथे शेतमाल विक्रीसाठी आणतात. परंतु या बाजारात शेतकºयांना त्रास होत असल्याचे दिसून आहे. विशेष म्हणजे खरीप हंगामातील पिकांची काढणी आल्यानंतर या बाजारात प्रचंड गर्दी होते. बाजाराच्या दिवशी गर्दी असल्याने वाहनांची मोठी रांग या परिसरात लागते. हजारो क्विंटल शेतमाल दर मंगळवारी बाजारात येतो. यावर्षी परतीचा पाऊस लांबल्याने सोयाबीन, मका, ज्वारी पिकांची काढणीही लांबली.सध्या मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, मका, ज्वारी, उडीद, मुग बाजारात येत आहे. परंतु शेतकºयांच्या शेतमालाची हर्रासी करण्यासाठी बांधण्यात आलेल्या टीन शेडमध्ये शेतकºयांऐवजी व्यापाºयांचाच माल जास्त आहे. हर्रासीसाठी शेतकºयांना शेतमाल ठेवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गत मंगळवारी आसलगाव बाजारात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात आली. यावेळी टीनशेडमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापाºयांचा शेतमाल ठेवण्यात आल्याचे दिसून आले. टीन शेडमधील सुमारे ७५ टक्के जागा व्यापाºयांनी साठा केलेल्या पोत्यांनी व्यापलेली दिसून आली.पुर्वेकडील शेवटच्या टीनशेड मध्ये शेतकºयांसाठी जागा शिल्लक असल्याचे दिसून आले. अनेक शेतकºयांना आपला माल टीन शेडच्या बाहेरच ठेवून हर्रासी करावी लागली.दरम्यान याकडे बाजार समिती प्रशासनाने लक्ष देऊन शेतकºयांसाठी शेतकºयांना त्रास होऊ नये, यासाठी टीन शेडमध्ये मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.माल टीनशेड बाहेर ठेवून हर्रासीजळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत आसलगाव उपबाजारातील टीनशेडमध्ये व्यापाºयांनी पोत्यांची रांग लावून मोठी जागा व्यापली, अशी माहिती ‘लोकमत’ प्रतिनिधीला मिळाली. यानंतर मंगळवार १९ नोव्हेंबर रोजी बाजारात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात आली. यावेळी टीनशेडमधील सुमारे ७५ टक्के जागेवर व्यापाºयांच्याच शेतमालाच्या पोत्यांची रांग दिसून आली. शेतकºयांना त्यांचा माल टीनशेडमध्ये ठेवताना मोठी कसरत करावी लागल्याचे दिसून आले. अनेक शेतकºयांना त्यांचा माल टीनशेड बाहेर ठेवून हर्रासी करावी लागल्याचेही दिसून आले.
एक टीन शेड शेतकºयांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. मंगळवारी स्वत: जाऊन परिस्थितीची पाहणी केली, ज्या व्यापाºयांचा माल तिथे होता, त्यांना दंड आकारण्यात येणार आहे. भविष्यातही अशी परिस्थिती उद्भवल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.-प्रसेनजित पाटीलसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद.