शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

रस्त्याच्या काँक्रिटीकरणास व्यापार्‍यांचा विरोध! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:00 AM

खामगाव : शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या प्रस्तावित कामास विरोध दर्शवित काँक्रीटीकरणाऐवजी डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी काही व्यापार्‍यांनी केली आहे.  याबाबत कृषीमंत्री तथा पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांना निवेदन देण्यात आले आहे. 

ठळक मुद्देना. फुंडकरांना निवेदन भाजपची विकास कामांवर ठाम असल्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या प्रस्तावित कामास विरोध दर्शवित काँक्रीटीकरणाऐवजी डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी काही व्यापार्‍यांनी केली आहे.  याबाबत कृषीमंत्री तथा पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, भारत कटपीस ते फरशी पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम नगर परिषदेने हाती घेतले. या कामावर साडे सहा कोटी रूपये खर्च करण्यात येणार असल्याच्या बातम्या वृत्तपत्रात वाचल्या आहेत. एक वर्षापुर्वी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम होणार होते. याकरीता ७0 लाख रूपयाचे टेंडर सुध्दा निघाले होते. परंतु कारण नसताना ते टेंडर रद्द करण्यात आले. व आता याच रस्त्यावर काँक्रीटीकरणाच्या नावाखाली कोट्यावधी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. सदर रस्ता सध्या डांबरी असून ७५ टक्केच्यावर सुस्थितीत आहे. या रस्त्यावर जड वाहनांची रहदारी नसल्यामुळे सिमेंट रस्ता करण्याची गरज नाही. तसेच रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाच्या निमित्ताने आमच्या दुकानासमोरील अनेक वर्षापासून बांधण्यात आलेल्या पायर्‍या, ओटे व टाईल्स तोडणार असल्याचे समजते. त्यामुळे दुकानात ग्राहकास येण्यास अडचण निर्माण होणार असून त्याचा परिणाम आमच्या व्यवसायावर होणार आहे. येणार्‍या काळात लग्न सराई असल्यामुळे ग्राहकांना सुध्दा त्याचा त्रास होईल. सदर निवेदनावर दर्शन वर्मा, जितेंद्र वर्मा, प्रेमचंद आरडेजा यांच्यासह अनेक व्यापार्‍यांच्या सह्या आहेत. 

विकासकामे सर्वांच्या हिताचीच - शिनगारेखामगाव शहरात नगर पालिकेमार्फत मोठय़ा प्रमाणात विकास कामे सुरु आहेत.  या अंतर्गतच शहरातील सर्वात महत्वाचा मुख्य रस्ता जो सतत वर्दळीचा असतो, तो कायमचा चांगला होण्याच्या दृष्टीने नगर परिषदेने तो काँक्रीटचा करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु राजकीय स्वार्थापोटी या रस्त्याचे रुंदीकरण होऊ नये यासाठी काही लोक प्रयत्नरत आहेत असा आरोप भाजपा शहराध्यक्ष संजय शिनगारे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला. शिनगारे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले की,  या रस्त्यामुळे व्यापार्‍यांचे कसे आर्थिक नुकसान होईल असे पटविण्याचे काम काही तथाकथीत हितचिंतक करीत आहेत.   मागिल १५ वर्षात व्यापार्‍यांच्या प्रतिष्ठानासमोर तुंबलेल्या नाल्या ज्यांच्याकडून साफ झाल्या नाहीत,  ज्यामुळे  व्यापार्‍यांना घाणीचा त्रास व वास सहन करावा लागत होता ते आज व्यापार्‍यांना त्यांचे हित सांगताना दिसत आहेत. नगरपालिकेने मेनरोड वरील व्यापार्‍यांचा  त्रास कायमचा दूर व्हावा या हेतूने ५ कोटी खर्च करुन काँक्रीटचा रस्ता नाल्यांसह बनविण्याचे ठरविले. त्यामुळे  व्यापार्‍यांसह नागरिकांना त्रास होणार नाही.याबाबत जे निवेदन देण्यात आले त्यावर काही व्यापार्‍यांनी सह्या नाही केल्या तरी त्यांची नावे यात टाकण्यात आली आहे. काही व्यापार्‍यांना रस्त्याचे काम तातडीने सुरु होण्यासाठी निवेदन द्यायचे आहे असे सांगून सह्या घेतल्या.  शहरात होत असलेल्या विकासकामांमुळे काही तथाकथित विकास पुरुषांचे धाबे दणाणले.  त्यामुळे उरले सुरले अस्तित्व राखण्यासाठी खोटे नाटे धंदे करुन विकास कामे रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.आरोपही शिनगारे यांनी केला.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा