लोणार : आठवडी बाजार, मा.बसवेश्वर चौक, अवैध प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने, फेरीवाले, रस्त्यावरच थांबणारी वाहने यामुळे शहरातील चौकात वाहतुकीचा खोळंबा झालेला असतो. कमळजा माता चौक ते मा.बसवेश्वर चौक व या चौकापासून कृषी उत्पन्न बाजार समिती पयर्ंत दिवसभर वाहतुकीची दयनीय अवस्था असते.मात्र याकडे वाहतूक शाखेचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.लोणार-रिसोड मार्गावरील कमळजा माता व मा.बसवेश्वर दोन चौक आहेत. रिसोड, मंठा, हिंगोलीकडे याच चौकातून जावे लागते. याच चौकांतून शेकडो वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे हे रस्ते नेहमीच वाहनांच्या गदीर्ने वाहत असतात. या चौकात वाहतूक पोलीस कधीही राहत नसल्याने वाहतुकीचा बट्याबोळझालेला दिसतो. त्यात कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणार्या मार्गावरून असलेल्या बसवेश्वर चौकात बेशिस्त वाहने उभी राहत असल्यामुळे या चौकात वाहतूक कोंडीत भर पडू लागल्याचे चित्र आहे. लोणार - रिसोड मार्गावर बेकायदेशीर व धोकादायकपणे प्रवासी वाहतुकीची यात भर असते. या दोन्हीचौकांत वाहतूक पोलीस थांबत नसल्याने खाजगी मालवाहतूक वाहने कुठेही उभी राहतात. जास्त धूर सोडणार्या वाहनांमुळे प्रदूषणातही वाढ होताना दिसते. त्यामुळे तेथून चालणेही कठीण होते.
लोणार शहरात वाहतुकीचा खोळंबा
By admin | Published: June 18, 2017 7:24 PM