धामणगाव बढे : पाणी फाऊंडेशन पुरस्कृत सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेच्या तिसºया पर्वात राज्यस्तरीय व्दितीय क्रमांकापर्यंत मजल मारणाºया मोताळा तालुक्यातील सिंदखेड (प्रजा) गावावरती इतर गावातील प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पाणी फाऊंडेशनने दिली असून १३ फेब्रुवारी पासून प्रारंभ होणाºया प्रशिक्षणासाठी जळगाव जामोद तालुक्यातील ५० प्रशिक्षणार्थींची पहिली बॅच गावात दाखल झाली आहे. सिंदखेड प्रजा हे सुमारे अडीच हजार लोकवस्तीचे गाव, कायम दुष्काळाची छाया व पाण्याचे दुर्भिक्ष्य अशा विपरीत परिस्थितीतून गावाला पाणीदार बनविण्याचा संकल्प सरपंच विमल कदम यांनी केला. त्याला गावकºयांची साथ मिळाली. त्यात वाटर कप स्पर्धेचे निमित्त झाले. गावकरी रात्रंदिवस श्रमदानासाठी एकत्र आले. विविध सामाजिक संघटनांचे पाठबळ मिळाले. आ.हर्षवर्धन सपकाळ, अॅड.गणेशसिंग राजपूत यांनी अनेकवेळा श्रमदानात प्रत्यक्ष सहभाग घेतला. वाटर कप स्पर्धेचा राज्यस्तरीय व्दितीय पुरस्कार गावाला मिळाला आणि पहिल्याच पावसात गाव पाणीदार बनले आता इतर गावांना पाणीदार बनविण्याची जबाबदारी वाटर फाऊंडेशनने सिंदखेड (प्रजा) गावावर टाकली. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण केंद्र दिले. १३ फेब्रुवारी पासून जळगाव जामोद तालुक्यातील एका वेळी दहा गावातील ५० प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतील. प्रत्येक बॅच चार दिवसाची असेल. सिंदखेड गावाने केलेले पाणलोटची कामे प्रत्यक्ष शिवार फेरीतून दाखविले जातील. पाणलोटाचे मॉडेल तसेच इतर प्रात्यक्षिकाव्दारे जलसंधारणाचे धडे देण्यात येतील. स्पर्धेचे नियम, मुल्यांकन, शिकविले जाईल. खेळ, कृतिगिताच्या माध्यमातून मनसंधारण केले जाईल. यासाठी प्रशिक्षक टिम सज्ज झाली असून त्यामध्ये तांत्रिक प्रशिक्षक मिलिंद आडे, चंद्रशेखर गोडघाटे, सामाजिक प्रशिक्षक सविता दांडगे, परमेश्वर आगलावे, तांत्रिक सहाय्यक चेतन घागरे यांचा समावेश आहे. तर प्रशिक्षणार्थींच्या व्यवस्थेसाठी गावकºयांसह ग्रामपंचायत पदाधिकारी, पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक सतिश राठोड, बिंदीया तेलगोटे, ब्रम्हदेव गिºहे व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वैराळकर परिश्रम घेत आहेत.
कायम दुष्काळग्रस्त संबोधल्या जाणाºया गावात जलसंधारणाचे धडे घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी येत आहे. झालेला हा बदल गावकºयांच्या एकतेचे, संघर्षाचे व श्रमदानाचे हे प्रतिक आहे. भविष्यात जलसंधारणाचे धडे घेण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून लोक येतील एवढे परिवर्तन आम्ही घडवू.-प्रविण कदमसामाजिक कार्यकर्ता, सिंदखेड