प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर.बियाणी यांनी केले. महाविद्यायलयाच्या कॅम्पस मुलाखतीमध्ये डाटा अॅनालिस्ट या पदासाठीच्या टेस्ट परीक्षेत १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्या विद्यार्थ्यांच्या अंतिम निवडीसह इतर विद्यार्थ्यांना मुलाखत व इतर प्रक्रियेबाबत योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन केले असल्याची माहिती बियाणी यांनी दिली. महाविद्यालयाचे सचिव माजी आ. राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस प्लेसमेंटचे काम सुरु असल्याचे स्पष्ट केले. साबे यांनी रूग्णांना सेवा देण्याचे हे एक नोबेल प्रोफेशन असून विद्यार्थ्यांनी फार्माकोविजिन्स क्षेत्रात करिअर करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. यावेळी प्राचार्य डॉ.बियाणी, प्राचार्य डॉ.आर.एच.काळे, प्राचार्य डॉ.आर.आर.पागोरे, डॉ.उपला मोहन कुमार, प्रा.पवन फोलाने, प्रा.एस.एस.कुळकर्णी, डॉ.ए.ए.गवई, डॉ.एजाज शेख, डॉ.सचिन काळे, डॉ.दुधे, डॉ.गोपाल बिहाणी प्राध्यापक वृृंद सहभागी झाले होते़ आभार ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंटचे समन्वयक प्रा.यू.एम.जोशी यांनी मानले.
अनुराधा फार्मसीत प्रशिक्षण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:23 AM