लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हा परिषदमध्ये बदल्यांचे सत्र सुरू होतच्या कर्मचाºयांची धाकधुक वाढते. कोरोनामुळे यंदा तीन महिने विलंबाने ह्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद अंतर्गतच्या १२२ कर्मचाºयांच्या मे महिन्यात होणाºया बदल्या मागील महिन्यात करण्यात आल्या. दरम्यान, आता जिल्हा परिषदच्या अंतर्गत वेगवेगळ्या विभागातील कर्मचाºयांच्या टेबल बदलण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत.दरवर्षी साधारणत: एप्रिल ते मे महिन्यात जिल्हा परिषदमध्ये बदल्यांचा पोळा फुटतो. परंतू यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे या बदल्यांनाही बाधा निर्माण झाली आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर शासकीय कार्यालयातील कामांमध्ये अनेक बदलाव पुढे आले. त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये होणाºया बदल्या स्थगीत करण्यात आल्या होत्या. कोरोनामुळे जिल्हा परिषदमधील प्रस्तावित बदल्या होऊ शकल्या नाही. लाकडाऊननंतर अनेक नियमांमध्ये शिथीलता मिळाल्याने जिल्हा परिषदचे कामकाजही सुरळीत सुरू झाले. दरम्यान, जुलैमहिन्यात जिल्हा परिषदच्या कर्मचाºयांच्या बदल्या करण्याच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. आॅगस्टमध्ये बदल्यांचा अहवाल पूर्ण झाला. त्यामध्ये जिल्हा परिषदमधील वेगवेगळ्या विभागातील १२२ कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या. जिल्हा परिषदसह पंचायत समिती स्तरावरील बदल्यांचाही समावेश आहे. कोरोनामुळे साधारणत: तीन महिने विलंबाने ह्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आता पुन्हा जिल्हा परिषदमध्ये अंतर्गत बदल्या होण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. यामध्ये विभागनिहाय कर्मचाºयांचे टेबल बदलण्याची प्रक्रिया असून, त्याचा आढावा घेण्यात येत आहे.येत्या चार ते पाच दिवसात जिल्हा परिषदमधील कर्मचाºयांचे अंतर्गत टेबल बदल होणार आहेत.
मागील महिन्यात जिल्हा परिषद अंतर्गत बदल्या पूर्ण झाल्या आहेत. आता जिल्हा परिषदमधील कर्मचाºयांचे टेबल बदलण्याविषयी आढावा घेण्यात येत आहे. नियमीत कामामध्ये व्यत्यय न येता ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल.-इंदिरा अस्वार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जि. प. बुलडाणा.