लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण करताना कंत्राटदाराकडून सामान्यांच्या सुरक्षीततेची कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. बुधवारी सकाळी वाहतूक सुरू असताना ऐन मोक्याच्या टॉवर चौकातील विद्युत पोल काढण्याचे काम कंत्राटदाराकडून केले जात होते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळा विस्कळीत झाली होती.खामगाव शहरातून जाणाºया रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम करताना रस्त्याचे काम करणाºया कंत्राटदाराकडून रस्ता सुरक्षा आणि इतर नियम धाब्यावर बसविल्या जात असल्याचे दिसून येते. बुधवारी ऐन वर्दळीच्या वेळी रस्त्यावरील विद्युत पोल काढण्यात येत होते. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला होता. ही बाब काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रहदारीच्यावेळी पोल हटविण्याचे काम थांबविण्यात आले.
वाहतूक सुरू असतानाच वीज खांब हटविणे सुरु!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 4:47 PM