खामगाव: दुचाकीवरून गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीसांनी सापळा रचून एकास अटक केली. त्याच्या जवळून ३० हजार रुपयांचा गुटखा आणि दुचाकी जप्त करण्यता आली. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक मनोज वासाडे यांनी पिंपळग्ाव राजा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, खामगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील आरोपी सुरेश मोतीराम दाभाडे ४७ हा दुचाकीवरून गुटखा वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीला पिंपळगाव राजा येथील एका धाब्यासमोर पकडण्यात आले. त्याची झडती घेण्यात आली असता प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि दुचाकी असा एकुण ६९२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी दाभाडे विरोधात भादंवि कलम ३२८, १८८, २७२, २७३, सहकलम १५८/ १७७, ५०/१७७ मोटार वाहन कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आली.