शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
2
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
3
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
4
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
6
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
7
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
8
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
9
"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
10
'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."
11
कौतुकास्पद! देशातील पहिले डिजिटल शिक्षणाचे ऑनलाईन पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
12
अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका! ट्रम्प चीनवर लादणार २४५% कर, झटक्यात १००% वाढ
13
बॉबी देओलने खरेदी केली शानदार रेंज रोव्हर SUV, किंमत आहे कोटींच्या घरात, जाणून घ्या
14
“मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही”; राज-एकनाथ शिंदे भेटीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले
15
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
16
“सोनिया गांधी-राहुल गांधींवरील ED कारवाई सुडबुद्धीने, काँग्रेस डगमगणार नाही”: चेन्नीथला
17
गुरुवारी लक्ष्मी नारायण त्रिकोण योग: ९ राशींना घवघवीत यश, भरघोस लाभ; ऐश्वर्य, वैभव प्राप्ती!
18
IPL 2025: बुमराह पाठोपाठ आणखी एक गोलंदाज फिटनेस टेस्टमध्ये पास; झाला संघात सामील
19
Sharvari Wagh : "गेल्या ५ वर्षात मी दररोज नापास होत होते..."; अभिनेत्री शर्वरी वाघने केला रिजेक्शनचा सामना
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार आदर्श पत्नी कोण? वाचा 'हा' श्लोक आणि जाणून घ्या लक्षणं!

बुलडाणा शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 15:31 IST

शहरातील जवळपास सर्वच चौकांमध्ये अस्ताव्यस्त वाहने उभी केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळते.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरातील वाहतुक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. योग्य नियोजनाअभावी अनेकवेळा वाहतुकीची कोंडी निर्माण होते. यामुळे वाहनधारक व सर्वसामान्य नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.येथे दररोज जिल्हाभरातील नागरिकांची कामानिमित्त वर्दळ असते. त्यामुळे सहाजिकच रस्त्यावर वाहनांची गर्दी निर्माण होते. शहरातील जवळपास सर्वच चौकांमध्ये अस्ताव्यस्त वाहने उभी केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. किरकोळ अपघाताचे प्रकारही अनेवेळा घडलेले आहेत. शहरातील जांभरूण रोडवर सर्वात जास्त वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे चित्र दररोज निर्माण होते. मोठ्या प्रमाणात होणारी बेशिस्त पार्किंग व वाढते अतिक्रमण या परिस्थितीला कारणीभूत आहे. या रस्त्यावर दवाखान्यांची संख्या जास्त असल्यामुळे सर्वात जास्त रुग्णांसह त्यांचे नातेवाईक या रस्त्याने ये-जा करतात. परंतु दिवसातून किमान तीन ते चार वेळा या मार्गावर स्ट्राफीक जाम झाल्याचे पाहायला मिळते. या परिस्थितीमुळे अनेकवेळा संगम चौकापासून दवाखाना व इतर नियोजित ठिकाणी पोहचायला जवळपास २० मिनिटे ते त्यापेक्षाही जास्त वेळ लागत असल्याचा अनुभव येतो. शहरातील वाहतुक व्यवस्थेवर पोलिसांचे योग्य नियंत्रण नसल्याने असे प्रकार सातत्याने घडतात. अपघात टाळण्यासाठी व वाहनधारकांचा त्रास कमी करण्यासाठी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी वाहतुक पोलिसांनी प्रत्येक चौकात प्रत्यक्ष उपस्थित राहिल्यास यामध्ये सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. सर्वात जास्त वर्दळ असणाऱ्या संगम चौक, जयस्तंभ चौक व स्टेट बँक चौकात वाहतूकीची कोंडी असते.  

आठवडी बाजारात पार्किंगचा प्रश्नआठवडी बाजारात येणाºया नागरिकांना आपले वाहन पार्किंग करण्यासाठी योग्य जागाच नसल्याने खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकवेळा अर्ध्या रस्त्यावर वाहने उभी करावी लागत असल्याने आठवडी बाजार परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होते. येथील पार्किंग व्यवस्थेचे पद्धतशीरपणे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. वाहतुक पोलिसांनी याबाबत कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

सिग्नलव्यवस्था ठरतेय शाभेची वस्तू४नगरपालिकेच्या वतीने शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी मुख्य चौकांमध्ये सिग्नलची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये संगम चौक, जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक, त्रिशरण चौक, कारंजा चौक व तहसील चौकाचा समावेश आहे. मात्र ही सिग्नलव्यवस्था कार्यान्वितच झाली नसल्याने त्याचा वाहतुक सुरळीत करण्याच्या दृष्टीने कोणताही उपयोग होता दिसून येत नाही. परिणामी ही संपूर्ण सिग्नल व्यवस्था सद्य:स्थितीत केवळ शोभेची वस्तू ठरत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाTrafficवाहतूक कोंडी