खामगाव, दि. १५: गणेशोत्सवानिमित्त झालेल्या भंडार्याच्या कार्यक्रमात १३४ जणांना विषबाधा झाल्याची घटना बुधवारी नारायणपूर ता.नांदुरा येथे घडली होती. या सर्व रुग्णांना उपचारासाठी स्थानिक सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दरम्यान, दुसर्या दिवशी गुरुवारी सकाळी यापैकी १२७ रुग्णांना सुटी देण्यात आली असून, सात रुग्णांवर दुसर्या दिवशीही उपचार सुरु आहेत. गणेशोत्सवादरम्यान नारायणपूर येथे १४ सप्टेंबर रोजी गावकर्यांनी आयोजित केलेल्या भंडार्यात पोळी, काशिफळाची भाजी, वरण, भात असा महाप्रसाद घेतल्यानंतर सायंकाळी महाप्रसाद घेतलेल्या काही ग्रामस्थांना उलटी, मळमळ, चक्कर येणे यासारखे त्रास जाणवू लागल्याने त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे उपचारासाठी धाव घेतली होती. सुरुवातीला ८0 व उशिरा रात्रीपर्यंंंत एकूण १३४ रुग्णांना उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, दुसर्या दिवशी यापैकी १२७ रुग्णांना सुटी देण्यात आली असून, कुणाल सुनील वानखडे (वय ११), राहुल सुनील वानखडे (वय १२), विजेंद्र श्रीकृष्ण वानखडे (वय १९), दीपक विश्राम वानखडे (वय २२) रा.निमगाव, प्रगती बाबूराव वाघ (वय ६), नितीन श्रीकृष्ण वानखडे (वय १८) रा.नारायणपूर असे सात जणांवर दुसर्या दिवशीही उपचार सुरू आहेत.
विषबाधा झालेल्या सात रुग्णांवर उपचार सुरूच
By admin | Published: September 16, 2016 2:58 AM