कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था सांभाळण्याचे आव्हान
बुलडाणा : सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटातून प्रत्येक जण जात आहे. कोरोनाला मात देण्यासाठी राज्य शासन लढत आहे. शासनाने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केलेली आहे. कोरोनाशी लढत असताना अर्थव्यवस्था सांभाळण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे.
डोणगाव परिसरात पावसाची दांडी
डोणगाव : मेहकर तालुक्यात सुरुवातीला पाऊस चांगला पडल्याने शेतकऱ्यांनी विविध पिकांची पेरणी केली; परंतु नंतर पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेल्या पाण्याने सिंचन करून पिके जगविण्यास सुरुवात केली आहे.
शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा
सुलतानपूर : कर्जमाफीचा लाभ मिळूनही अनेक शेतकरी नवीन पीक कर्जापासून वंचित असल्याचे चित्र आहे. मागील कर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्यास काही बँकांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
हिरवाईने नटला भगवती माता मंदिर परिसर
धामणगाव धाड : अजिंठा ते बुलडाणा महामार्गावरील मराठवाड्याच्या सीमेवर असलेला वाढोणा येथील भगवती माता मंदिर डोंगर भाग हिरवळीने नटला आहे. येथील निसर्गरम्य ठिकाण भाविकांना आकर्षित करणारे आहे; परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे यंदा दरवर्षीप्रमाणे भाविकांची गर्दी याठिकाणी दिसून येत नाही.