लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव: डोणगाव हे राज्य महामार्गावरील व घाटबोरी वनपरिक्षेत्रात असणारे गाव असून, या ठिकाणी लकडी कटाईच्या तीन आरामशीन आहेत. या गावाच्या परिसरात एकेकाळी घनदाट वृक्ष होते; पण गत काही वर्षांपासून जोमाने वृक्ष कटाई सुरू असताना याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.डोणगाव व परिसरात अनेक लाकडाचे व्यापारी निर्माण होऊन सध्या खुलेआम बाभूळ कटाई करून जळतनाच्या नावाखाली विक्री होत आहे. एवढेच नव्हे तर एका बाभळीच्या झाडाची परवानगी काढून त्यावर परिसरातील लोक अनेक बाभळीच्या वृक्षांची कत्तल करून परिसरात जळतनाच्या नावाखाली परजिल्हय़ात या लाकडाची विक्री करीत आहेत. स्थानिक महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सदर वृक्षतोड करणारे सर्रास वृक्ष तोडणार्या मशीनचा वापर करून रात्री-अपरात्री व सकाळी वृक्षांची वाहतूक करताना डोणगाव परिसरात दिसून येत आहेत. याकडे महसूल प्रशासनाने लक्ष देऊन वृक्ष तोडणार्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. तर अनेक जण रस्त्याच्या कडेला असणार्या वृक्षांची तोड करीत असून, रस्त्यात जाणार असल्याचा नावाखाली करीत आहेत, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
डोणगाव परिसरातील घाटबोरी वनपरिक्षेत्रात वृक्षतोड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:49 PM
डोणगाव हे राज्य महामार्गावरील व घाटबोरी वनपरिक्षेत्रात असणारे गाव असून, या ठिकाणी लकडी कटाईच्या तीन आरामशीन आहेत. या गावाच्या परिसरात एकेकाळी घनदाट वृक्ष होते; पण गत काही वर्षांपासून जोमाने वृक्ष कटाई सुरू असताना याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
ठळक मुद्देमहसूल प्रशासनाचे दुर्लक्षबाभूळ कटाई करून जळतनाच्या नावाखाली होतेय विक्री