बुलडाणा : हिंदू संस्कृतीत मकर संक्रांतीला महत्त्व आहे. एकमेकांच्या मनातील द्वेष, मत्सर, वैरत्व संपुष्टात आणून एकमेकांना ह्यतीळगूळ घ्या गोड गोड बोलाह्ण चा संदेश देत परंपरागत सण साजरा करतात; मात्र एक नवीन उपक्रम राबवून पृथ्वीवरील पर्यावरण टिकविण्याकरिता वृक्ष लावण्याची गरज लक्षात घेऊन बांधकाम कामगार संघटनेच्या महिला वर्गाने एकामेकींना वृक्षाची रोपे वाटप करून मंगळवारी एक अभिनव उपक्रम राबविला. कार्यक्रमा दरम्यान वाटप करण्यात आलेल्या रोपांपैकी काही रोपांचे गावात रोपण करण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतिश बिडकर, नीशा पावडे, मंगला चौधरी प्रमिला सवडे, बेबी बोरकर, रुपाली जोशी, लक्ष्मी शर्मा, शशिकला दाभाडे, शोभा प्रधान, छाया व्यवहारे, भारती शिंदे, लक्ष्मी डिघे, सविता जाधव, लीला शिंदे, प्रभा इंगळे, सविता ठेंग, सविता बोरकर, संगीता गायकवाड, रमा जाधव, उषा नाटेकर आदी महिला उपस्थित होत्या.
महिलांनी दिले झाडाचे वाण!
By admin | Published: January 28, 2016 12:14 AM