स्थानिक जिजाऊ नगरमध्ये प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे व नगरसेविका प्रा.मिनल नीलेश गावंडे यांच्या पुढाकाराने जिजाऊ नगरातील जागृती वाचनालय येथे पार पडलेल्या या श्रद्धांजलीपर कार्यक्रमाला शिवसेना नेते प्रा.नरेंद्र खेडेकर, एपीआय दवणे, नगरसेवक दत्ता सुसर, सुधीर चेके पाटील, बंडू कदम, अनिकेत तायडे, यश शिंदे, अक्षय सावंत, गणेश लोखंडे, बाळू गव्हाणे, प्रभाकर बावस्कर, मंगेश भुतेकर यांच्यासह या भागातील महिला व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केल्यानंतर सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तर गांधी चौकात आठ आॅगस्ट रोजी सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन छोटु कांबळे यांनी केले होते. यामध्ये शहीद जवान कैलास पवार यांचे बंधू अक्षय पवार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून व कँडल पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शाम शिंगणे, नारायण भोलवनकर, विक्की धनवे, शंभू गाडेकर, रवी पेटकर, बंटी कपूर आदींसह गांधीनगर व परिसरातील महिला व पुरूषांची उपस्थिती होती. वीर जवान अमर रहे.. भारत माता की जय.. या जयघोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
शहीद जवान पवार, काळुसे व शिवशंकर पाटील यांना श्रध्दांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:39 AM