शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार

By admin | Published: October 09, 2016 2:00 AM

राष्ट्रीय महामार्गावर अपघात; दोघांवर जळगावमध्ये उपचार सुरू.

मलकापूर(जि. बुलडाणा), दि. 0८- भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघे जण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी दीड वाजता राष्ट्रीय महामार्गावर घडली. जखमींना गंभीर अवस्थेत जळगाव खान्देशकडे नेत असताना वाटेतच एका जखमीचा मृत्यू झाला. नागपूर येथून एचआर.३८-व्ही२४0१ हा ट्रक भरधाव वेगात व निष्काळजीपणे मुक्ताईनगरकडे जात असताना या ट्रकने मुक्ताईनगरकडून मलकापूर शहराकडे येत असलेल्या एमएच २८-एएच ५३७ या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत अन्वर करीम (वय ४0) रा.कुलमखेल, गुलाबखा इबुखा (वय २५), अफजलखा रशिदखा (वय ३0) दोघे रा.धनगरपुरा (पारपेठ) हे तिघे जण गंभीररीत्या जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच काँग्रेस तालुकाध्यक्ष अँड.हरीश रावळ, मनसे जिल्हा उपाध्यक्ष गजानन ठोसर, काँग्रेस शहर अध्यक्ष राजू पाटील, नगरसेवक अनिल बगाडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमींच्या नातेवाइकांनी पुढील उपचारासाठी जखमींना जळगाव खान्देशकडे हलविले. दरम्यान, तिघा जखमींपैकी अफजलखा रशिदखा (वय ३0) याचा वाटेतच मृत्यू झाला.