मोताळा, दि. २८- बुलडाणा-मलकापुर मार्गावरील राजुर घाटात शुक्रवारी ट्रक व कारचा अपघात झाला.अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, आय टेन कार क्रमांक (एम एच २८ व्ही ८४६१) मोताळयाकडून बुलडाणाकडे जात असताना. राजुर घाटाच्या खालील दुसर्या वळनावर समारून येत असलेल्या ट्रक क्रमांक (एम एच २८ ए.बी. ७८४३) ने कारला जबर धडक दिली. या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले असून कारच्या समोरील भागाचा चुराड.ा झाला. अपघात घड.ताच ट्रक चालक फरार झाला.माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले. अपघात घडल्यानंतर राजुर घाटात काही वेळ ट्राफिक जाम झाली होती. दरम्यान पोलिसानी वाहतुक सुरळीत केली. याप्रकरणी वृत्त लिहीपयर्ंत बोराखेडी पोलिसांची कार्यवाही सुरु होती.
राजुर घाटात ट्रक-कारचा अपघात
By admin | Published: October 29, 2016 2:41 AM