लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कर्तव्यावर असलेल्या शिवाजीनगर पोस्टेच्या वाहतुक पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालून त्यास जीवे मारण्याचा प्रत्न झाल्याची घटना १७ फेब्रुवारीरोजी घाटपूरी महामार्गावरील चोपडेच्या मळ्याजवळ घडली होती. खामगाव शहरातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वाहतुक कर्मचारी नायक पोलिस काँन्स्टेबल राहूल इंगळे हे मंगळवारी सकाळी घाटपूरी महामार्गावर ड्युटी करीत होते. खामगाव शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सुरु असल्याने शहराबाहेरून वाहतूक वाढली आहे. दरम्यान स्कार्पिओ कार क्रमांक सीजी ०४ एच ८५९३ ही घाटपूरी मंदिराकडून भरधाव वेगात येतांना दिसून आली. संबधित वाहनास त्यांनी कारला थांबण्याचा इशारा दिला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून वाहतुक नियमाचे उल्लंघन करत या वाहनचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न करत गाडी राहूल इंगळे यांच्या अंगावर घातली. प्रसंगावधान साधल्याने राहूल इंगळे बजावले. पोलिसांनी कार थांबवून चालक सुरेन्द्रसिंग प्यारासिंग जोहर (३७) रा. धुळे यास ताब्यात घेतले आहे. त्याचेविरूध्द राहूल इंगळे यांच्या तक्रारीवरून कलम ३५३, ३३२, ३३७,२७९ भादंवि सहकलम १८६, १८४, १३२, १३८,१७७ मोवाका नुसार गुन्हा दाखल केला आहे.
वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली गाडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 3:34 PM