- ब्रह्मानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गामूळे बंद असलेला गुरांचा बाजार आता भरण्यास सुरूवात झाली आहे. या बाजारातील अर्थचक्र हळूहळू रुळावर येत आहे. गुरांच्या खरेदी, विक्रीच्या नोंदणीकडे दुर्लक्ष होत असल्याने गुरांच्या बाजारातील लाखाेंची उलाढाल केवळ विश्वासावर चालत आहे. जिल्ह्यात खामगाव पाठोपाठ बुलडाणा तालुक्यातील दुधा, सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा, चिखली याठिकाणी गुरांचे मोठे बाजार भरतात. या बाजारांमध्ये जिल्ह्यातीलच नव्हे, तर मराठवाडा, मध्य प्रदेशातूनही गुरे विक्रीसाठी येतात. कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार आता प्रत्येक ठिकाणी भरण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी बऱ्याच ठिकाणी प्रतिसाद दिसून आला नाही. परंतू गुरांच्या या बाजारतून होणारी उलाढाल आता हळूहळू वाढण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जानेफळ येथील बकऱ्यांच्या बाजारातही मंदी दिसून आली.
बैलजोडीच्या किंमती लाखाेंच्या घरात चांगली बैलजोडी घ्यायची असेल, तर एक ते दीड लाख रुपयांपर्यंतच पैसे मोजावे लागतात. म्हशीच्या किंमतीही ४० हजार रुपयांच्या पुढे आहेत. दोन दात केलेल्या गोऱ्ह्याच्या किंमतीही ५० हजार रुपयांच्या घरात आहेत.