लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: केंद्र शासनाच्या अध्यादेशाविरोधात बाजार समिती कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या लाक्षणीक बंदला जिल्हयात प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बाजार समित्यांमधील खरेदी विक्रीचे व्यवहार बंद राहिल्यामुळे े शुक्रवारी १३ ही बाजार समित्यातंर्गत सहा कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली.शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे व्यापार आणि व्यवहार (प्रचलन व सुविधा) अध्यादेश २०२० ची अमंमलबजावणी राज्यात केली जात आहे. दहा आॅगस्ट रोजी त्यासंदर्भाने पणन संचालकांनी आदेश काढले होते. त्यामुळे बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर तथा २० नोव्हेंबर २०१७ रोजी शासनाने बाजार समिती कर्मचाºयांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी गठीत केलेल्या अभ्यास समितीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही. परिणामी त्यावर निर्णय घेण्यात यावा या मागणीसाठी २१ आॅगस्ट रोजी बाजार समित्यांमधील कर्मचाºयांनी हा बंद पुकारला होता. त्यामुळे पहाटे पाच ते रात्री १२ पर्यंत बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे खामगाव, चिखली, मलकापूर बाजार समितीसह जिल्ह्यातील एकूण १३ बाजार समित्यांमधील सहा कोटी रुपायंची आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. या संपामध्ये जिल्हयातील बाजार समित्यांपैकी कार्यरत १८२ कर्मचाºयांपैकी १८० कर्मचाºयांनी सहभाग घेतला होता तर दोन कर्मचारी रजेवर गेले होते. परिणामी बाजार समित्यांमध्ये २१ आॅगस्ट रोजी सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
बाजार समित्यांमधील सहा कोटींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 11:15 AM