- अनिल गवईखामगाव: पारंपारिक पिक पध्दतीला फाटा देत, खामगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करण्यास सुरूवात केली. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पध्दत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी ‘फल’दायी ठरत असल्याचे दिसून येते.केळी उत्पादनात पारंपारिक पिक पध्दतीत ५ बाय ५ अथवा ५ बाय ६ फूट अंतरावर झाडांची लागवड केली जाते. या पध्दतीत अतिवृष्टीमुळे वादळी वाºयाच्या कालावधीत झाडांच्या रक्षणाची जोखीम असते. हा धोका लक्षात घेता खामगाव तालुक्यातील वरणा येथील एका प्रगतीशील कास्तकाराने पहिल्यांदाच जोड ओळ (पट्टा पध्दतीने) साडेचार फूट बाय ९ फूट अंतरावरे केळीची लागवड केली. या पध्दतीमुळे खर्चात कपात होवून उत्पादनात वाढ झाली. उन्हाळ्यात आंतर पिक म्हणून कांद्याचेही उत्पादन या शेतकºयाने घेतले. मात्र, अतिवृष्टीमुळे कांदा पिकाला फटका बसला होता. आता केळीने या शेतकºयाला तारले आहे.
४५ टनाचे विक्रमी उत्पादन- खामगाव तालुक्यातील वरणा येथील प्रगतीशील शेतकरी चंद्रसिंग इंगळे यांनी पहिल्यांदाच जोड-ओळ(पट्टा पध्दतीने) दीड एकरात केळीची लागवड केली.
तालुक्यातील पहिलाच प्रयोग!आॅललाइन पध्दतीचा अवलंब करीत या शेतकºयाने जोड-ओळ पध्दतीने केळीची लागवड केली. केळी लागवडीचा हा पहिलाच प्रयोग असून यापूर्वी काळेगाव येथील एका शेतकºयाने मका पिकाचे उत्पादन घेतले होते.
पिक पध्दतीत बदल केल्याने उत्पादनात वाढ झाली. जोळ-ओळ पध्दतीत अतिवृष्टी आणि वादळी वाºयात पिकांचे रक्षण होते. या पध्दतीने शेती केल्याचा आनंद आहे.- चंद्रसिंह इंगळेशेतकरी, वरणा ता. खामगाव.
जोड-ओळ पध्दतीमुळे झाडांना आधार मिळतो. नुकसान टळून उत्पादनात वाढ होते. या पध्दतीत एका एकरात ३० टनापर्यंत उत्पादन शक्य आहे. वरणा येथील शेतकºयाने केलेला प्रयोग यशस्वी ठरला आहे.- गणेश गिरीतालुका कृषी अधिकारी, खामगाव.