ठळक मुद्देशहरात मोरपंखाची विक्री होत असल्याचे उघडकीसवन विभागाने पाळत ठेवून केली कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरात सर्रासपणे मोरपंखाची विक्री होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर वन विभागाने दोन जणांना मोरपंखाची विक्री करताना रंगेहात पकडले. बुधवारी बारादरी व जगदंबा चौकातून वनपरिक्षेत्र अधिकारी सोळंके यांनी रणजितसिंग सुजनसिंग राजकुमार व बिमलेसकुमार श्रीराजकुमार दोघे रा. उत्तर प्रदेश ह.मु. बुलडाणा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मोरपंख जप्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात मोरपंखाची विक्री होत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे वन विभागाने पाळत ठेवून ही कारवाई केली.