शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

बिबट्या, रोहीच्या गूढ मृत्यूप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:12 AM

जानेफळ : स्थानिक मळी शेतशिवारात मृत अवस्थेत आढळलेल्या बिबट्या व रोहीच्या गुढ मृत्यूप्रकरणी वन विभागाने १९ जुलै रोजी दोघांना ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कजानेफळ : स्थानिक मळी शेतशिवारात मृत अवस्थेत आढळलेल्या बिबट्या व रोहीच्या गुढ मृत्यूप्रकरणी वन विभागाने १९ जुलै रोजी दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, त्या दोघांनाही मेहकर न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. जानेफळ येथील श्याम मांगीलाल गट्टाणी यांच्या मळी शिवारातील गट क्र.१०५ मधील शेतात नाल्याकाठी १६ जुलै रोजी बिबट्या व रोही कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते. त्यामुळे बिबट्या व रोहीच्या मृत्यूबद्दल परिसरात एकच खळबळ उडाली होती. बिबट्याच्या पोटावर जळाल्याचा मोठा काळा चट्टा असल्याने सदर बिबट्याचा विद्युत शॉकने मृत्यू झाल्याचा हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे वन विभागाने याबाबत तातडीने तपास सुरू केला. दरम्यान, १९ जुलै रोजी माळेगाव येथील सुरेश प्रल्हाद लोखंडे (३४) व किशोर आश्रू गाढवे (२८) या दोघांना वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, उभय दोघांनाही मेहकर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.